Jump to content

"सुमनताई बेहेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुमनताई बेहेरे (जन्म :मुंबई, १२ मार्च १९२६; मृत्यू : मुंबई, ऑक्टोबर...
(काही फरक नाही)

१४:२२, २० नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

सुमनताई बेहेरे (जन्म :मुंबई, १२ मार्च १९२६; मृत्यू : मुंबई, ऑक्टोबर २०१४) यांनी आपले पती पु.वि. बेहेरे ऊर्फ राजाभाऊ बेहेरे यांच्या समवेत मेनका प्रकाशन ही संस्था काढली.

सुमनताई बेहेरे यांच्या प्रकाशन संस्थेने 'मेनका' (१९६०), 'माहेर' (१९६२) ही कौटुंबिक आणि 'जत्रा' (१९६३) हे विनोदी नियतकालिक सुरू केले. या तिन्ही नियतकालिकांना अल्पकाळातच वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. 'मेनका प्रकाशन'च्या जाहिरात विभागाची धुरा सुमनताईंनी समर्थपणे सांभाळली. मुंबई-पुणे असा प्रवास करीत, अत्यंत कष्टाने दांडग्या लोकसंचयाच्या जोरावर त्यांनी प्रकाशनाची आर्थिक बाजू भक्कम केली. 'मेनका' आणि 'माहेर' मासिकांच्या विशेषांकांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली.


आचार्य अत्रे यांनी 'मेनका'वर भरलेला खटला ही त्यांच्या आयुष्यातील अत्यंत खडतर बाब होती. परंतु त्या प्रसंगालाही त्यांनी धीराने तोंड दिले. राजाभाऊ बेहरे यांच्या निधनानंतर सुमनताई आणि त्यांच्या मुलींनी तब्बल दहा वर्षे 'मेनका प्रकाशन'ची धुरा सांभाळली. तरुण वयात मुंबईला असताना सुमनताईंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासमवेत काम केले होते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वाढीसाठी काम करणार्‍यास सुमनताई या काही काळ मंडळाच्या अध्यक्षाही राहिल्या.