Jump to content

"टिटवी (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: टिटवी हा एक पक्षी आहे. हिला संस्कृतमध्ये टिट्‌टिभ, टिट्‌टिभक किं...
(काही फरक नाही)

१४:४१, १२ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

टिटवी हा एक पक्षी आहे. हिला संस्कृतमध्ये टिट्‌टिभ, टिट्‌टिभक किंवा कोयष्टिक म्हणतात. इंग्रजीत तिला लॅपविंग असा शब्द आहे. टिटवीला झाडावर बसता येत नाही. ती जमिनीवरच तुरुतुरू चालते. जमीन उकरून त्यात अंडी घालते. टिट्‌-टिट्‌-ट्यूटिट्‌ असा आवाज काढून उडताना संकटाचा थोडा जरी संशय आला, तरी ती इतरांना सावध करते. टिटवा-टिटवी हे शब्द ज्ञानेश्वरीत दोनदा आले आहेत. .संत एकनाथ यांनी टिटवी नावाचे भारूड लिहिले आहे.

कुररी नावाचा एक वेगळा पक्षी आहे.संस्कृतमध्ये तिला उत्क्रोश म्हणतात आणि इंग्रजीत ’इंडियन व्हिस्कर्ड टर्न. टिटवीप्रमाणेच हाही पक्षी नदीकाठच्या वाळूत अंडी घालतो. मराठी वाङ्‌मयात कुररीला टिटवा असे म्हटले आहे. कुररीचा उल्लेख महाभारतातील शांतिपर्वात, पंचतंत्र, रघुवंश, कथासरित्सागर, भागवताचा अकरावा स्कंध आदी ठिकाणी आला आहे.