"शरद राजगुरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: '''डॉ. शरद नरहर राजगुरू''' (जन्म : २६ नोव्हेंबर १९३३) हे एक जागतिक कीर्... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''डॉ. शरद नरहर राजगुरू''' (जन्म : २६ नोव्हेंबर १९३३) हे एक जागतिक कीर्तीचे भूपुरातत्त्वज्ञ आहेत. त्यांचा जन्म पुण्यात शनिवार पेठेत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी १९५५साली भूशास्त्र या विषयातली पदवी घेतली आणि १९५७साली आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन महिन्याततच शरद राजगुरू यांनी जमशेदपूर येथे सरकारी नोकरी मिळाली, पण ती लवकरच सोडली. पुण्यातील टाय एक्स्प्लो जीव्ह्ज (एचई), मुंबईतील खंडेलवाल आणि नंतर मुंबईतील मिनिस्ट्री ऑफ सायंटिफिक अन्ड कल्चरल अफेअर्स अशा ठिकाणीही त्यांनी भूशास्त्रज्ञ म्हणून नोकर्या केल्या. पण एकाही नोकरीत ते टिकले नाहीत. |
'''डॉ. शरद नरहर राजगुरू''' (जन्म : २६ नोव्हेंबर १९३३) हे एक जागतिक कीर्तीचे भूपुरातत्त्वज्ञ आहेत. त्यांचा जन्म पुण्यात शनिवार पेठेत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी १९५५साली भूशास्त्र या विषयातली पदवी घेतली आणि १९५७साली आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन महिन्याततच शरद राजगुरू यांनी जमशेदपूर येथे सरकारी नोकरी मिळाली, पण ती लवकरच सोडली. पुण्यातील टाय एक्स्प्लो जीव्ह्ज (एचई), मुंबईतील खंडेलवाल आणि नंतर मुंबईतील मिनिस्ट्री ऑफ सायंटिफिक अन्ड कल्चरल अफेअर्स अशा ठिकाणीही त्यांनी भूशास्त्रज्ञ म्हणून नोकर्या केल्या. पण एकाही नोकरीत ते टिकले नाहीत. |
||
==पीएच.डी== |
|||
नोकरीत आपल्याला काही तरी नवीन करायला-शिकायला मिळेल असे राजगुरू यांना वाटे. पण तसे काहीच न झाल्याने त्यांनी कोणत्या तरी संस्थेत जाऊन नवीन संशोधन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मे १९५८मध्ये पुण्यातल्या डेक्कन कॉलेजातील डॉ. सांकलिया यांना पत्र लिहिले आणि आपली इच्छा कळविली. सांकलियांच्या सांगण्याप्रमाणे शरद राजगुरूंनी नोव्हेंबर १९५८मध्ये गोदावरी खोर्यातील पुरातत्त्व आणि पर्यावरणीय पुरातत्त्वावर संशोधनाला सुरुवात केली. त्यात त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यांचे निवारण करता न आल्याने राजगुरूंनी पीएच.डी करण्याचा नाद सोडून दिला, आणि परत नोकरीचे कुठे जमते आहे का ते पहायला सुरुवात केली. |
नोकरीत आपल्याला काही तरी नवीन करायला-शिकायला मिळेल असे राजगुरू यांना वाटे. पण तसे काहीच न झाल्याने त्यांनी कोणत्या तरी संस्थेत जाऊन नवीन संशोधन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मे १९५८मध्ये पुण्यातल्या डेक्कन कॉलेजातील डॉ. सांकलिया यांना पत्र लिहिले आणि आपली इच्छा कळविली. सांकलियांच्या सांगण्याप्रमाणे शरद राजगुरूंनी नोव्हेंबर १९५८मध्ये गोदावरी खोर्यातील पुरातत्त्व आणि पर्यावरणीय पुरातत्त्वावर संशोधनाला सुरुवात केली. त्यात त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यांचे निवारण करता न आल्याने राजगुरूंनी पीएच.डी करण्याचा नाद सोडून दिला, आणि परत नोकरीचे कुठे जमते आहे का ते पहायला सुरुवात केली. |
||
==पुन्हा नोकरी== |
|||
१९६०साली शरद राजगुरू यांचे लग्न झाले. त्यावेळी ते मुंबईत नोकरी करत होते. एके दिवशी अचानक डॉ. सांकलिया घरी आले आणि त्यांनी राजगुरू यांना पुण्यात डेक्कन कॉलेजात भूशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची नोकरी देऊ केली. त्या कॉलेजातून त्यावेळी श्री. मिश्रा व आणखी दोघा जणांची पीएच.डी पूर्ण होत आली होती, पण त्यांना डावलून, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे पीएच.डी.. न करता आलेल्या राजगुरूंना नोकरी मिळाली. कारण सांकलियांना त्या जागी भूपुरातत्त्वज्ञच हवा होता. १२ जुलै १९६१ रोजी राजगुरूंनी एम.ए.च्या वर्गात विद्यार्थ्यांना पहिले भाषण दिले. |
|||
==पुन्हा पीएच.डी.== |
|||
पुरात्तत्त्व विभागात नोकरी सुरू झाल्यावर शरद राजगुरू यांनी मुळा-मुठा नदी प्रणालीच्या उत्तर चतुर्थक कालखंडातील भूपुरातत्त्वीय इतिहासावर संशोधन केले. या संशोधनात त्यांना पुण्यातील दत्तवाडीजवळ एक महत्त्वाचा स्तराभिलेख सापडला. त्या स्तराभिलेखात राजगुरूंना, चतुर्थक कालखंडातील पर्जन्यमानातील बदल आणि त्यामुळे मुठेच्या वागणुकीत पडलेला फरक यांचे अतिशय चांगले चित्रण दगड, गोटे, वाळू, रेव, माती अशा अवसादांच्या स्वरूपात पहायला मिळाले. |
|||
==आणखी संशोधन== |
|||
पीएच.डी पूर्ण झाल्यावर शरद राजगुरू यांनी भारतातील दक्षिण पठारी नद्या, सौराष्ट्र, उर्वरित गुजराथ, राजस्थान, केरळ, तमिळनाडूचा किनारा, आसाम, मणिपूर, नर्मदेचे खोरे,गारो टेकड्या, कोकण, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर अशा भारतातील जवळजवळ सर्व प्रांतांमध्ये चतुर्थक कालखंडातील भूपुरातत्त्वीय घडामोडींवर क्षेत्रीय संशोधन आणि समान्वेषण केले. यांशिवाय महाराष्ट्रातील नेवासा, इनामगाव व वाळकी, राजस्थानातील डिडवाना व बालाथल, सौराष्ट्रातील कुंतासी व पाद्री, मध्य प्रदेशातील समनापूर आणि कर्नाटकातील हुसंगी येथील उत्खनांमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणून भूमिका बजावली. त्या काळात भारतात ते एकमेव भूपुरातत्त्वज्ञ होते, त्यामुळे डेक्कन कॉलेजाव्यतिरिक्त राजगुरू यांना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग आणि बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातर्फे होणार्या उत्खनांमध्ये सल्लागार म्हणून बोलावणी येत. आता राजगुरू सेवानिवृत्त झाले असले तरी अशा आमंत्रणांचा ते अजूनही स्वीकार करतात. |
|||
==ऑस्ट्रेलियातील संशोधन== |
|||
१९७४साली शरद राजगुरू यांना ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या जैविक भूगोल आणि भूरचना विज्ञान विभागात एका वर्षासाठी व्हिजिटिंग फेलो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. |
|||
२३:१०, १० नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
डॉ. शरद नरहर राजगुरू (जन्म : २६ नोव्हेंबर १९३३) हे एक जागतिक कीर्तीचे भूपुरातत्त्वज्ञ आहेत. त्यांचा जन्म पुण्यात शनिवार पेठेत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी १९५५साली भूशास्त्र या विषयातली पदवी घेतली आणि १९५७साली आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन महिन्याततच शरद राजगुरू यांनी जमशेदपूर येथे सरकारी नोकरी मिळाली, पण ती लवकरच सोडली. पुण्यातील टाय एक्स्प्लो जीव्ह्ज (एचई), मुंबईतील खंडेलवाल आणि नंतर मुंबईतील मिनिस्ट्री ऑफ सायंटिफिक अन्ड कल्चरल अफेअर्स अशा ठिकाणीही त्यांनी भूशास्त्रज्ञ म्हणून नोकर्या केल्या. पण एकाही नोकरीत ते टिकले नाहीत.
पीएच.डी
नोकरीत आपल्याला काही तरी नवीन करायला-शिकायला मिळेल असे राजगुरू यांना वाटे. पण तसे काहीच न झाल्याने त्यांनी कोणत्या तरी संस्थेत जाऊन नवीन संशोधन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मे १९५८मध्ये पुण्यातल्या डेक्कन कॉलेजातील डॉ. सांकलिया यांना पत्र लिहिले आणि आपली इच्छा कळविली. सांकलियांच्या सांगण्याप्रमाणे शरद राजगुरूंनी नोव्हेंबर १९५८मध्ये गोदावरी खोर्यातील पुरातत्त्व आणि पर्यावरणीय पुरातत्त्वावर संशोधनाला सुरुवात केली. त्यात त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यांचे निवारण करता न आल्याने राजगुरूंनी पीएच.डी करण्याचा नाद सोडून दिला, आणि परत नोकरीचे कुठे जमते आहे का ते पहायला सुरुवात केली.
पुन्हा नोकरी
१९६०साली शरद राजगुरू यांचे लग्न झाले. त्यावेळी ते मुंबईत नोकरी करत होते. एके दिवशी अचानक डॉ. सांकलिया घरी आले आणि त्यांनी राजगुरू यांना पुण्यात डेक्कन कॉलेजात भूशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची नोकरी देऊ केली. त्या कॉलेजातून त्यावेळी श्री. मिश्रा व आणखी दोघा जणांची पीएच.डी पूर्ण होत आली होती, पण त्यांना डावलून, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे पीएच.डी.. न करता आलेल्या राजगुरूंना नोकरी मिळाली. कारण सांकलियांना त्या जागी भूपुरातत्त्वज्ञच हवा होता. १२ जुलै १९६१ रोजी राजगुरूंनी एम.ए.च्या वर्गात विद्यार्थ्यांना पहिले भाषण दिले.
पुन्हा पीएच.डी.
पुरात्तत्त्व विभागात नोकरी सुरू झाल्यावर शरद राजगुरू यांनी मुळा-मुठा नदी प्रणालीच्या उत्तर चतुर्थक कालखंडातील भूपुरातत्त्वीय इतिहासावर संशोधन केले. या संशोधनात त्यांना पुण्यातील दत्तवाडीजवळ एक महत्त्वाचा स्तराभिलेख सापडला. त्या स्तराभिलेखात राजगुरूंना, चतुर्थक कालखंडातील पर्जन्यमानातील बदल आणि त्यामुळे मुठेच्या वागणुकीत पडलेला फरक यांचे अतिशय चांगले चित्रण दगड, गोटे, वाळू, रेव, माती अशा अवसादांच्या स्वरूपात पहायला मिळाले.
आणखी संशोधन
पीएच.डी पूर्ण झाल्यावर शरद राजगुरू यांनी भारतातील दक्षिण पठारी नद्या, सौराष्ट्र, उर्वरित गुजराथ, राजस्थान, केरळ, तमिळनाडूचा किनारा, आसाम, मणिपूर, नर्मदेचे खोरे,गारो टेकड्या, कोकण, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर अशा भारतातील जवळजवळ सर्व प्रांतांमध्ये चतुर्थक कालखंडातील भूपुरातत्त्वीय घडामोडींवर क्षेत्रीय संशोधन आणि समान्वेषण केले. यांशिवाय महाराष्ट्रातील नेवासा, इनामगाव व वाळकी, राजस्थानातील डिडवाना व बालाथल, सौराष्ट्रातील कुंतासी व पाद्री, मध्य प्रदेशातील समनापूर आणि कर्नाटकातील हुसंगी येथील उत्खनांमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणून भूमिका बजावली. त्या काळात भारतात ते एकमेव भूपुरातत्त्वज्ञ होते, त्यामुळे डेक्कन कॉलेजाव्यतिरिक्त राजगुरू यांना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग आणि बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातर्फे होणार्या उत्खनांमध्ये सल्लागार म्हणून बोलावणी येत. आता राजगुरू सेवानिवृत्त झाले असले तरी अशा आमंत्रणांचा ते अजूनही स्वीकार करतात.
ऑस्ट्रेलियातील संशोधन
१९७४साली शरद राजगुरू यांना ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या जैविक भूगोल आणि भूरचना विज्ञान विभागात एका वर्षासाठी व्हिजिटिंग फेलो म्हणून काम करण्याची संधी मिळाली.