"राग हमीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: हमीर हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातला एक राग आहे. याला हंबीर... |
(काही फरक नाही)
|
१७:२४, ३१ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
हमीर हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातला एक राग आहे. याला हंबीर असेही म्हणतात. रागचंद्रोदय या ग्रंथात हमीरचा उल्लेख आहे. केदारश्याम आणि कामोद हे हमीरचे समप्रकृती राग आहेत.
कर्नाटकी संगीतातल्या हमीर कल्याणी या रागाशी उत्तर हिंदुस्तानी हमीरशी गल्लत होऊ नये. हमीर कल्याणचे सांम्य केदार रागाशी आहे.
डागर बंधू, गुंदेच्या बंधू हमीरमध्ये ध्रुपद गातात. कृष्णराव शंकर पंडित, नारायणराव व्यास, डी.व्ही. पलुस्कर, गजाननबुवा जोशी, उल्हास कशाळकर, वीणा सहस्रबुद्धे आदी ग्वाल्हेर घराण्यातील गायकांचा हमीर हा आवडता राग आहे.
हमीर रागातील काही नाट्यगीते आणि बंदिशी
- अजब दुनिया(कुमार गंधर्व)
- कोकिळा गा (मराठी भावगीत). (या गीतात हमीर+केदार आहे)
- चमेली फूली चंपा (कुमार गंधर्व) (शुभा मुद्गल)
- जा जा रे जा रे रंगरेज्या (कुमार गंधर्व)
- ढीठ रंगरवा कैसे घर जाऊँ (पारंपरिक-पद्मा तळवलकर)
- थाट समरिचा दावी नट (द्रौपदी नाटकातले गीत)
- मधुबन में राधिका नाचे रे (गायक मुकेश)
- मैं तो लागी रे तोरे चरनवा (उस्ताद मुबारक अली खान)
- रण में अटल, अचल हो कर्रिपुका दर्प वीर नर हरत हैं (पटवर्धनबुवांच्या रागविज्ञान या पुस्तकातली माहिती)
- सुर की गती मैं क्या जानूँ (गायक मुक्श)
- सुलझा रही (कुमार गंधर्व)
- हे जगदीश सदाशिव शंकर (कट्यार काळजात घुसली नाटकातले गीत)
- हेतु तुझा फसला (मराठी नाटक संशयकल्लोळमधले गीत)