"ब्रह्मानंद देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: महामहोपाध्याय ब्रह्मानंद देशपांडे (जन्म : १९४०; मृत्यू : पुणे, ६ ऑग... |
(काही फरक नाही)
|
२३:४५, २५ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
महामहोपाध्याय ब्रह्मानंद देशपांडे (जन्म : १९४०; मृत्यू : पुणे, ६ ऑगस्ट, २०१३) हे एक मराठी इतिहास संशोधक, प्रसिद्ध वक्ते आणि महानुभाव पंथाचे अभ्यासक होते.
ब्रह्मानंद देशपांडे हे मूळचे औरंगाबादचे. मराठवाडय़ातील एक ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक, कार्यकर्ता म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या देशपांडे यांचे शिक्षण नागपूर आणि मध्यप्रदेशातील सागर येथे झाले. यानंतर त्यांनी पैठण, औरंगाबाद आणि नागपूर येथील महाविद्यालयात इतिहास शिकवत होते. त्यांनी औरंगाबाद येथील सरस्वती महाविद्यालयात सलग ३१ वर्षे इतिहास अध्यापनाचे काम केले. शिक्षणाबरोबरच इतिहास संशोधनात उतरलेल्या देशपांडे यांनी पुढे महाराष्ट्रातील सातवाहनापासून ते मराठ्यांच्या कालखंडांचा मोठा अभ्यास केला. या बरोबरच अजिंठा-वेरूळची लेणी, पैठण, सातवाहन समाज, महानुभाव पंथ, संतवाङ्मय, कवी भूषण हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते.
या संशोधनावरच त्यांची पंचवीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.