"मृदुला गर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मृदुला गर्ग (जन्म : कलकत्ता, २५ ऑक्टोबर, १९३८) या एक हिंदी भाषा|हिं...
(काही फरक नाही)

००:०१, ५ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

मृदुला गर्ग (जन्म : कलकत्ता, २५ ऑक्टोबर, १९३८) या एक हिंदी लेखिका आहेत. १९६०मध्ये अर्थशास्त्र विषयात एम.ए. केल्यानंतर त्यांनी ३ वर्षे दिल्ली विद्यापीठात अध्यापन केले आहे. कादंबर्‍या, कथासंग्रह, नाटके आणि ललित लेखसंग्रह वगैरे मिळून, मृदुला गर्ग यांची सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

मृदुला गर्ग यांची प्रसिद्ध पुस्तके

  • अनित्या (कादंबरी)
  • उर्फ सैम (कथासंग्रह)
  • उसके हिस्से की धूप (कादंबरी)
  • एक और अजनबी (नाटक)
  • एक यात्रा संस्मरण- कुछ अटके कुछ भटके (ललित लेखसंग्रह)
  • कठगुलाब (कादंबरी)
  • कर लेंगे सब हज़म (विनोदी)
  • कितनी कैदें (कथासंग्रह)
  • ग्लेशियर से (कथासंग्रह)
  • चर्चित कहानियाँ (कथासंग्रह)
  • चित्तकोबरा (कादंबरी)
  • जादू का कालीन (नाटक)
  • जूते का जोड़ गोभी का तोड़ (कथासंग्रह)
  • टुकड़ा टुकड़ा आदमी (कथासंग्रह)
  • डैफ़ोडिल जल रहे हैं (कथासंग्रह)
  • तीन कैदें और सामदाम दंड भेद (नाटक)
  • मिलजुल मन (कादंबरी)
  • मेरे देश की मिट्टी अहा (कथासंग्रह)
  • मैं और मैं (कादंबरी)
  • रंग ढंग तथा चुकते नहीं सवाल (ललित लेखसंग्रह)
  • वंशज (कादंबरी)
  • शहर के नाम (कथासंग्रह)
  • समागम (कथासंग्रह)
  • संगति विसंगति (कथासंग्रह)


मृदुला गर्ग यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • उत्तर प्रदेश हिंदी संस्थान यांचा साहित्य भूषण सन्मान
  • ’उसके हिस्से की धूप’ला मध्य प्रदेश सरकारचा पुरस्कार (१९७५)
  • ’जादू का कालीन’ला नाट्यलेखनाचा मध्य प्रदेश सरकारचा पुरस्कार (१९९३)
  • २००३ साली सुरीनाममध्ये झालेल्या जागतिक हिंदी संमेलनात मिळालेला जीवनगौरव साहित्य सेवा सन्मान
  • कठगुलाब या कादंबरीसाठी ज्ञानपीठाचा वाग्देवी पुरस्कार (२००३)
  • कठगुलाब या कादंबरीसाठी २००४ मध्ये व्यास सन्मान
  • ’मिलजुल मन’साठी साहित्य अकादमी पुरस्कार (२०१३)
  • हिंदी अकादमीचा १९८८ सालचा साहित्यकार सन्मान