"एच.एल. दत्तू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारताचे ४२वे सरन्याधीश एच.लक्ष्मीनारायणस्वामी. दत्तू यांचा जन्...
(काही फरक नाही)

२३:३५, २ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

भारताचे ४२वे सरन्याधीश एच.लक्ष्मीनारायणस्वामी. दत्तू यांचा जन्म : १३ डिसेंबर १९५० रोजी झाला. त्यांच्या कुटुंबात कुणीच वकिली करीत नाही. त्यांच्या पत्नी गायत्री नोकरी करतात. त्यांचा मुलगा अभियंता आहे, तर मुलगी व जावई डॉक्टर आहेत. एच.एल दत्तू मात्र वकिलीने सुरुवात करून सार्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. 'आपले सर्वोच्च न्यायालय ही जगातील एक सर्वोत्तम संस्था आहे', असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

एच.एल. दत्तू हे टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची सुनावणी करणाऱ्या न्यायालयीन पथकाचेे प्रमुख आहेत व फक्त चौदा महिन्यांच्या सेवेनंतर दत्तू निवृत्त होणार आहेत. त्यामुळे एवढ्या काळात हा खटला हातावेगळा करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

कर्नाटकात न्यायालयीन कर्मचार्‍यांसाठीच्या सोसायटीमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश डावलून तिघा न्यायाधीशांनी भूखंड स्वीकारल्याचे प्रकरण त्यांच्याविरुद्ध १९९४ पासून प्रलंबित आहे.

दत्तू यांची न्यायालयीन कारकीर्द

  • १९७५ मध्ये बंगलोर येथेे त्यांनी वकिली सुरू केली.
  • १९८३ पासून त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात विविध पदांवर काम केले. काही काळ ते कर विभागात सरकारी वकीलही होते.
  • १९९५ मध्ये ते कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.
  • २००७ मध्ये त्यांना छत्तीसगड उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.
  • नंतर ते केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.
  • २००८ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवडले गेले.
  • २०१४ साली ते सरन्यायाधीश झाले.
  • नोव्हेंबर २०१५मध्ये नियोजित निवृत्ती.