Jump to content

"प्रदीप पंड्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. प्रदीप पंड्या (जन्म : २९ एप्रिल १९४२) हे एम.डी. डॉक्टर असून मूत्र...
(काही फरक नाही)

२३:१४, ८ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

डॉ. प्रदीप पंड्या (जन्म : २९ एप्रिल १९४२) हे एम.डी. डॉक्टर असून मूत्रपिंड विशेषज्ञ आहेत. भारताच्या गुजराथ प्रांतामधल्या नडियाद शहरातील ’मूळजीभाई किडनी रुग्णालया’त त्यांनी २६ वर्षे काम केले आहे. निवृत्तीनंतर ते बडोद्यामध्ये ’प्रेमदास जलाराम रुग्णालया’त सुपरिन्टेन्डन्टच्या पदावर काम करीत आहेत. त्या शहरात त्यांची खासगी प्रॅक्टिसही आहे.

इ.स. १९९२मध्ये प्रदीप पंड्या यांनी गुजराथी साहित्यक्षेत्रात पदार्पण केले. त्यांचे कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबर्‍या व अनुवाद मिळून ३१हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ’ધ હોસ્પિટલ’ ही डॉ. प्रदीप पंड्या यांनी लिहिलेली गुजराथी साहित्यजगतातील पहिली मेडिकल थ्रिलर कादंबरी. या कादंबरीचा ’द हॉस्पिटल’ नावाचा मराठी अनुवाद चंद्रशेखर संत यांनी केला आहे आणि तो डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे.

डॉ. प्रदीप पंड्या यांनी त्यानंतर गुजराथी भाषेत वीज-अमृत, तांडव आणि बारूद या नावांच्या तीन ’वैद्यकीय थरार’.कादंबर्‍याही लिहिल्या आहेत.