Jump to content

"हुल्लड मुरादाबादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हुल्लड मुरादाबादी (जन्म : गुजरानवाला-पाकिस्तान, २९ मे १९४२; मृत्य...
(काही फरक नाही)

१३:५८, १९ जुलै २०१४ ची आवृत्ती

हुल्लड मुरादाबादी (जन्म : गुजरानवाला-पाकिस्तान, २९ मे १९४२; मृत्यू : मुंबई, १२ जुलै २०१४) हे एक हिंदी हास्यकवी होते. त्यांचे मूळ नाव सुशीलकुमार चढ्ढा. हास्यकविता लिहिताना 'हुल्लड मुरादाबादी'‘ याच नावाने ते प्रसिद्ध झाले.

फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात मुरादाबाद येथे आला. सुरुवातीला त्यांचा ओढा वीररसातील कविता लिहिण्याकडे होता, पण नंतर हास्यकवितेत त्यांना सूर सापडला. त्यांनी हास्यकवितांच्या मैफलींमध्ये लोकांना लोटपोट हसवले. १९६२च्या सुमारास त्यांनी 'सब्र' या टोपणनावाने हिंदी कवितालेखनात पदार्पण केले. त्यानंतर मात्र त्यांचे नाव देशोदेशी पोहोचले. 'संतोष' व 'बंधनबाहो' या दोन चित्रपटांत त्यांनी भूमिकाही केल्या होत्या.

हुल्लड मुरादाबादी त्यांच्या कवितांमध्ये अतिशय छोटी वाटणारी कल्पना फुलवत नेत असत, पण त्यांचा मूळ उद्देश श्रोत्यांना हसवणे हाच होता यात शंका नाही. त्यांनी दोहे स्वरूपात काव्यरचना केली. एका दोह्यात ते म्हणतात, 'कर्जा देता मित्र को वो मूरख कहलाय, महामूर्ख वो यार है जो पैसे लौटाय।' पोलिसांवर व्यंग हा नवीन विषय नाही. मुरादाबादी यांनी त्यांच्या एका दोहय़ात पोलिसांची विनोदी फिरकी घेतली आहे. ते म्हणतात, 'बिना जुर्म के पिटेगा, समझाया था तोय, पंगा लेकर पुलिस से साबित बचा न कोय।' राजकारणावरही ते असेच भाष्य करतात. ते म्हणतात, 'जिंदगी में मिल गया कुर्सियों का प्यार है, अब तो पांच साल तक बहार ही बहार है। कब्र में हैं पांव, पर फिर भी पहलवान हूं, अभी तो मैं जवान हूं।' त्यांनी कवितेला शेरोशायरीच्या परडीत घोळून तिचा सुगंध सतत दरवळत ठेवला. लहान मुलांनाही त्यांची कविता समजत असे इतका सोपेपणा त्यात होता