Jump to content

"विलास जैतापकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विलास जैतापकर (जन्म : मुंबई, १४ मार्च १९४८; मृत्यू : मुंबई, ३० एप्रिल...
(काही फरक नाही)

१५:५१, ७ मे २०१४ ची आवृत्ती

विलास जैतापकर (जन्म : मुंबई, १४ मार्च १९४८; मृत्यू : मुंबई, ३० एप्रिल २००५) यांना नव्या पिढीचे शाहीर म्हटले जाते. शाहिरी परंपरेचा नंदादीप तेवत ठेवण्यामध्ये शाहीर विलास जैतापकर यांचेही मोठे योगदान होते.

विलास जैतापकर यांचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची, संगीताची, शाहिरीची ओढ होती. पुढे त्यांनी ‘शाहीर विलास जैतापकर पार्टी’ काढली व गिरगाव, गिरणगावसह मुंबईबाहेरही शेकडो कार्यक्रम केले. जैतापकरांना मराठी भाषा, मराठी आस्मतेचा प्रचंड अभिमान होता. ‘युवक बिरादरी’ या सांस्कृतिक संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते.

विलास जैतापकर हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते संत गाडगेबाबा अभियानापर्यंतच्या सामाजिक-राजकीय कार्यांत सतत आघाडीवर असत. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातील ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन’ या गीताचे तेच गीतकार होते. गाडगेबाबा अभियानात जैतापकरांनी सादर केलेली ‘स्वच्छतेचा पांडुरंग’ ही कलाकृती महाराष्ट्रात कमालीची गाजली.

जैतापकरांचा गणपतीची गाणी लिहिण्यात तर हातखंडा होता. आजही गणेशोत्सवात जैतापकर यांनी लिहिलेली गाणीच प्राधान्याने ऐकायला मिळतात. त्यांच्या सुमधुर गीतांनी रसिकांना, गणेशभक्तांना अक्षरश: वेड लावले होते. आजही ही गीते गणेशोत्सवातले खास आकर्षण असते.

पछाडलेला या मराठी चित्रपटात जैतापकारांनी रचलेली गीते आहेत. विलास जैतापकरांगीते असलेले ४०हून अधिक आल्बम आहेत आणि त्यांत त्यांची बरीच गाणी आहेत.

विलास जैतापकरांची गीते असलेले आल्बम

  • ग गणपतीचा
  • गणपती टॉप १३ (२००९ आणि २०१०च्या आवृत्त्या)
  • तांडव
  • मला आई व्हायचंय
  • वणीची सप्तशृंगी
  • विठ्ठलाचा छंद
  • सोन्याचा नारल दर्याला

विलास जैतापकारांची गाजलेली गाणी

  • आई तुझ्या गं लेकरा मिळे चारी निवारा
  • आई माझी एकवीरा
  • आदि गणाचा तू गणनायक
  • आले आले गणपती
  • आले आले गणपती आले
  • चिक मोत्याची माळ होती गं वीस तोळ्याची
  • छान सजवा पालखी
  • जय गणेश जय गणेश
  • जय जय गजानन राजा
  • झाला वरीस बांधवा
  • तुझं माझ्याशी नातं हे असं कसं आहे
  • तू सुखकर्ता विघ्नहर्ता
  • देव मोदकवाला पाहिजे
  • नवसाला पावला हाकेला धावला
  • पयलं नमन, आम्ही करितो वंदन
  • पालखी निघाली राजाची
  • बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला
  • मंगलमूर्ती बोला बोला
  • या हो दर्शन घ्याया
  • वाजत गाजत आले
  • सनईच्या सुरात ढोलाच्या गजरात