"राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही भारत सरकारची योजना महाराष्...
(काही फरक नाही)

१८:१२, १ मे २०१४ ची आवृत्ती

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही भारत सरकारची योजना महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येते. ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशा लोकांना या योजनेद्वारे दीड लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय मदत मिळावी, अशी योजना आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रत्येक कुटुंबामागे वर्षाला ३३३ रुपये देते. जुलै २०१२मध्ये ही योजना अमरावती, गडचिरोली, धुळे, नांदेड, मुंबई, रायगड आणि सोलापूर या जिल्ह्यांत सुरू झाली असे सांगितले जाते.

नागपूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०१३च्या तिसऱ्या आठवड्यात या योजनेचा गाजावाजा करून ही योजना सुरू करण्यात आली. सोनिया गांधी यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत शकुंतला भगत यांना या योजनेत समाविष्ट केल्याबद्दलचे कार्ड देण्यात आले.

शकुंतला भगत यांचे वाडी परिसरात आठ खोल्यांचे आलिशान घर असून त्या खोल्यांपैकी सहा खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या आहेत. त्यांच्या घरी दिवाण, टीव्ही, फ्रीज, लाकडी सोफा, पलंग, सुसज्ज स्वयंपाकघर, गॅस सिलिंडराण इतर सर्व जीवनावश्यक वस्तू आहेत. त्यांच्या घरी वातानुकुलित यंत्रेही लावलेली आहेत. शकुंतला भगत यांना दोन मुले, दोन सुना, नातवं असा परिवार आहे. एका मुलाचा ट्रॅन्सपोर्टचा व्यवसाय असून त्याच्याकडे दोन ट्रक्स आहेत. दुसरा एका खासगी कंपनीत नोकरीला असून त्याचे उत्पन्नही चांगले असल्याचे समजते.

शकुंतला भागत या लाभार्थीच्या निवडीमुळे, केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या ह्या आणि अशा अनेक योजनांचा फायदा गोरगरिबांना न होता, काँग्रेस पक्षाशी संबंधित श्रीमंतांनाच मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


संदर्भ