"दत्तू बांदेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: दत्तू बांदेकर (जन्म : १९०९; मृत्यू ४ ऑक्टोबर १९५९) हे कानडी भाषेत ज... |
(काही फरक नाही)
|
१४:२६, २६ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
दत्तू बांदेकर (जन्म : १९०९; मृत्यू ४ ऑक्टोबर १९५९) हे कानडी भाषेत जेमेतेम सात ’बुकं’ शिकून मराठी भाषवर प्रभुत्व मिळविणारे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वगळ्याच प्रकृतीचे मराठी लेखक होते. त्यांचे सारे जीवन कष्टात गेले, पण त्यांच्या स्वभावात त्याचा कडवटपणा कधी उतरलेला कुणी पाहिला नाही. मोठ्मोठ्या विद्वानांपासून तए अगदी गावंढळापर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या लिखाणाने लोभविले.
आचार्य अत्र्यांचे ते उजवे हात होते. १९३४साली आचारर्य अत्रे, दत्तू बांदेकर, सुंदर मानकर आणि कॅप्टन मा.कृ. शिंदे यांनी ’साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळ’ नावाचे साहित्यावर चर्चा करणारे मंडळ काढले होते. मंडळाच्या पहलीच सभा विभावरी शिरूरकर यांच्या वाङ्मयावर मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाली होती. तेव्हापासून अत्रे आणि बांदेकरांची मैत्री सुरू झाली.
जुलै १९४०पासून बांदेकर आचार्य अत्र्यांच्या साप्ताहिक नवयुगमध्ये ’रविवारचा म्रावळा’ नावाचे सदर लिहीत.
चित्रपटविषयाला वाहिलेल्या ’चित्रा’ मासिकात ्प्रसिद्ध होणाऱ्या ’सख्या हरी’ या टोपणनावाखाली प्रकाशित होणाऱ्या बांदेकरांच्या सदरामुळे ते महाराष्ट्राचे लाडके लेखक झाले.
दत्तू बांदेकर यांचे प्रकाशित वाङ्मय
- अतिप्रसंग
- अनिल
- अमृतवाणी
- आडपडदा
- आपकी सेवामे (हिंदी चित्रपटाची पटकथा, १९४७)
- आर्य चाणक्य
- आवळ्या भोपळ्याची मोट
- कबुली जबाब
- कारुण्याचा विनोदी शाहीर
- गडी फू
- गुंडाच्या तावडीतील सुंदरी
- चिरीमिरी (१९५९)
- चुकामूक
- चोरपावले
- जावईशोध (नाटक)
- तू आणि मी
- तो आणि ती
- नजरबंदी
- नवी आघाडी
- पंचगव्य (विडंबन काव्यसंग्रह, १९५७. या पुस्तकात बांदेकरांच्या ३६ कविता आहेत, बाकीच्या अत्र्यांच्या)
- पेचपसंग
- प्यारी
- प्रेमपत्रे
- प्रेमाचा गुलकंद (१९५९)
- बहुरूपी
- विचित्र चोर (नाटक, १९४३)
- वितंडवाद
- वेताळ प्रसन्न
- सख्याहरी
- हिरवी माडी
दत्तू बांदेकरांच्या जीवनावर लिहिली गेलेली पुस्तके, लेख, नियतकालिके वगैरे
- ’दर्पण’चा दत्तू बांदेकर जन्मशताब्दी विशेषांक (२००९)
- आठवणीतील बांदेकर (मनोहर बोर्डकर)
- दत्तू बांदेकर (चरित्र, लेखिका नेत्रा बांदेकर ऊर्फ नीलांबरी जोगीश)
- सं.ग. मालशे संशोधन केंद्रातर्फे सादर करण्यात आलेला दत्तू बांदेकरांवरील शोधनिबंध, कविता महाजन, १९९६)
(अपूर्ण)