"सुधाकर डोईफोडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुधाकर डोईफोडे (जन्म : १९४२; मृत्यू : २२ जानेवारी, २०१४) हे मराठवाड्...
(काही फरक नाही)

२३:०७, ६ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

सुधाकर डोईफोडे (जन्म : १९४२; मृत्यू : २२ जानेवारी, २०१४) हे मराठवाड्यातील नांदेडहून निघणाऱ्या सुप्रसिद्ध दैनिक प्रजावाणीचे संपादक होते. हे दैनिक त्यांनी नावारूपास आणले.

इतिहास, परराष्ट्रसंबंध, संरक्षण, भौगोलिक परिस्थिती हे डोईफोडे यांचे आवडीचे विषय होते. यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेख आणि अग्रलेख लिहिले. आणीबाणीच्या काळात 'प्रजावाणी'चे तीन अग्रलेख सरकारजमा झाले होते. याच काळात त्यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे १५ दिवसांचा कारावासही सुधाकर डोईफोडे यांना भोगावा लागला.

हैदराबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, मराठवाडा विकास आंदोलन, कच्छ बचाओ या आंदोलनांत सुधाकर डोईफोडे यांचा सहभाग होता. शेवटची अनेक वर्षे ते मराठवाडय़ातील रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी झटत होते. प्रत्येक रेल्वेमंत्र्याला भेटून मराठवाडय़ातील प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधत. गोविंदभाई श्रॉफ यांच्यानंतर रेल्वे प्रश्नाचे जाणकार म्हणून डोईफोडे यांचेच नाव घ्यावे लागेल. वृत्तपत्रीय तसेच विविध नियतकालिकांतून त्यांनी विपुल लेखन केले.