"संगीता जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: संगीता जोशी या मराठीतील एक गझलकवी आहेत. बी.एस्सी.बी.एड. झालेल्या स... |
(काही फरक नाही)
|
१२:२३, १ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
संगीता जोशी या मराठीतील एक गझलकवी आहेत. बी.एस्सी.बी.एड. झालेल्या संगीता जोशी ीएक निवृत्त शिक्षिका आहेत. त्या मराठीतील बहुधा पहिल्या स्त्री-गझलकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या गझलांची पाचांहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहांना कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, सुरेश भट, गं.ना.जोगळेकर यांची प्रशंसा वरील काव्य संग्रहांना लाभली आहे. अमरावती येथे भरलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाचें अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
संगीता जोशी यांचे काव्यसंग्रह
- चांदणे उन्हातले
- तू भेटशी नव्याने (गझलसंग्रह)
- नजराणा शायरीचा : (गालिब ते आधुनिक उर्दू कवींचे विविध शेर निवडून त्याचे मराठी अर्थ सांगणारे पुस्तक).
- म्युझिका
- वेदना संवेदना
- संगीता जोशी यांची गझल (पॉकेट बुक)
संगीता जोशी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- पुणे येथील रंगत संगत प्रतिष्ठान या संस्थेचा, प्रतिष्ठेचा मानला गेलेला गझलकाराला देण्यात येणारा भाऊसाहेब पाटणकर पुरस्कार
- अकोला येथून गझल संग्रहास दिला जाणारा शब्दांकुर पुरस्कार ’चांदणे उन्हातले’ या संग्रहास.
(अपूर्ण)