Jump to content

"पद्मजा फाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पद्मजा शशिकांत फाटक (जन्म : १४ नोव्हेंबर १९४२) या एक मराठी लेखिका आ...
(काही फरक नाही)

१६:४३, २१ मार्च २०१४ ची आवृत्ती

पद्मजा शशिकांत फाटक (जन्म : १४ नोव्हेंबर १९४२) या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठीच्या एम.ए. असून अमेरिकेतून पीएच.डी करून आल्या आहेत. १९६४ सालापासून पद्मजा फाटक विविध नियतकालिकांमधून लेखन करत आल्या आहेत. कथा, ललित लेख, बालसाहित्य, प्रवास-वर्णनात्मक, चरित्रात्मक, संशोधनपर अशा बहुविध स्वरूपाचे त्यांचे लेखन आहे. त्यांची १५हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

पद्मजा फाटक यांच्या पतीचे नाव शशिकांत, मोठ्या मुलीचे सोनिया आणि मुलाचे नाव श्रेयस असे आहे. ’हसरी किडनी’ या पुस्तकाच्या मुखपृष्टावर त्यांनी कंसात ’मजेत’ हे स्वतःचे टोपणनाव दिले आहे.

पद्मजा फाटक यांनी लिहिलेली पुस्तके

  • आवजो (प्रवासवर्णन)
  • चिमुकली चांदणी (बालसाहित्य)
  • गर्भश्रीमंतीचे झाड
  • चमंगख चष्टीगो (बालसाहित्य)
  • दिवेलागणी
  • पैशाचे झाड
  • बापलेकी (संपादित आत्मकथने, अन्य संपादिका - दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस)
  • बाराला दहा कमी (माहितीपर, सहलेखक - माधव नेरूरकर) : या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९६-९७चा पुरस्कार मिळाला आहे.
  • माणूस माझी जात
  • राही
  • शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक
  • सोनेलुमियरे
  • हरविलेली दुनिया
  • हसरी किडनी अर्थात "अठरा अक्षौहिणी” (आत्मकथन)
  • हिंद विजय सोसायटीचे पगडी आजोबा

पुरस्कार

  • महाराष्ट्र शासनाचे ५ पुरस्कार, इतर अनेक पारितोषिके, शिष्यवृत्ती, सन्मान, मानद नेमणुका इत्यादी