"सविता भीमराव आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. सविता आंबेडकर ऊर्फ माई आंबेडकर या डॉ. आंबेडकर|बाबासाहेब आंबे... |
(काही फरक नाही)
|
१२:२७, १९ मार्च २०१४ ची आवृत्ती
डॉ. सविता आंबेडकर ऊर्फ माई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (जन्म : १९०९; मृत्यू : मुंबई, २९ मे २००३) द्वितीय पत्नी.
माई आंबेडकरांचे माहेरचे नाव शारदा कबीर. त्यांचे घराणे राजापूर तालुक्यातील दोरला गा्वचे. त्यांचे वडील इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते.
शालेय शिक्षण पुण्यात घेतलेल्या माईंनी मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरीसाठीची एमबीबीएस ही डिग्री मिळवली. गुजराthaमध्ये काही काळ चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून एका हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर शारदा कबीर मुंबईत आल्या आणि डॉ. मालवणकरांबरोबर काम करू लागल्या. तिथेच १९४७ साली त्यांची आणि रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. आंबेडकरांची पहिली पत्नी रमा आंबेडकर यांचे २७ मे १९३५ रोजी निधन झाले होते आणि ते विधुराचे जिणे जगत होते.
१५ एप्रिल १९४८ रोजी आंबेडकरांशी विवाहबद्ध होऊन शारदा कबीर या सविता आंबेडकर झाल्या.
आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या लिखाणाच्या काळात आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माई बाबासाहेबांच्या समीप होत्या.
बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या अनुयायांनी सविताबाईंवर आंबेडकरांची दुखण्यामध्ये योग्य काळजी घेतली नसल्याचे आणि त्यांनी आंबेडकरांना विषप्रयोगाने मारल्याचे आरोप केले. या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तज्ज्ञांची एक समिती नेमली. समितीने माई आंबेडकरांना सर्व आरोपांतून मुक्त केले.
आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी सविता आंबेडकरांना वाळीत टाकले.
त्या्नंतर डॉ. माई आंबेडकर दिल्लीत मेहरोलीच्या फार्महाऊसमध्ये राहूलागल्या. दलित पँथरच्या काही लोकांच्या आणि रामदास आठवले, गंगाधर गाडे यांच्यासारख्या काही रिपब्लिकन पार्टीच्या तरुण सदस्यांच्या आग्रहाने माई दलित चळवळीच्या मुख्य प्रवाहात येत होत्या. मात्र वाढत्या वयामुळे व ढासळत्या प्रकृतीमुळे त्यांना ते फार काळ जमले नाही.
डॉ. सविता आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्याचा आधार घेऊन आणि माईंच्या सक्रिय मदतीच्या आधारे डॉ. जब्बार पटेल यांनी आंबेडकरांच्या आयुष्यावर एक चित्रपट तयार केला.
डॉ. सविता ऊर्फ माई आंबेडकर यांचे दीर्घ आजाराने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात २९ मे २००३ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. तत्कालीन पंतप्रधान, अटल बिहारी बाजपेयी दुःख व्यक्त करताना म्हणाले की, ’माई आंबेडकर या बाबासाहेबांच्या स्फूर्तीचा स्रोत होत्या. त्या स्वतःच एक मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या.’
माई आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके
- बाबासाहेबांच्या सहवासात