Jump to content

"संजीवनी (कवी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: संजीवनी (पूर्ण नाव - संजीवनी रामचंद्र मराठे - जन्म : पुणे, १४ फेब्रु...
(काही फरक नाही)

२३:४७, १३ मार्च २०१४ ची आवृत्ती

संजीवनी (पूर्ण नाव - संजीवनी रामचंद्र मराठे - जन्म : पुणे, १४ फेब्रुवारी १९१६) या एक सुस्वर कविता गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या.

संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. महिला विद्यापीठाच्या त्या जी.ए. (गृहीतागमा) व एम. ए. होत्या.

संजीवनी मराठे यांचे कवितासंग्रह/बालसाहित्य

  • अंजू (मूळ लेखिका - अंजू व्हॉन वेर्श/ संपादिका संजीवनी मराठे)
  • आत्मीय
  • इच्छामणी आणि इतर गोष्टी (बालसाहित्य)
  • काव्यसंजीवनी (१९४८)
  • गंमत (बालसाहित्य)
  • चंद्रफूल (१९५१)
  • चित्रा (१९४७)
  • छाया (१९४९)
  • ट्युलिप्सच्या देशातून (पत्रसंग्रह, मूळ लेखिका - अंजू व्हॉन वेर्श/ संपादिका संजीवनी मराठे)
  • परिमला (१९५९)
  • बरं का गं आई (१९६२- बालकवितासंग्रह)
  • भावपुष्प (१९५१)
  • मराठी साहित्य दर्शन (ललित लेख, भाग १ ते १०)
  • माझा भारत (बालसाहित्य)
  • माणिकमोती (बालकविता)
  • मासुमा आणि इतर प्राणिकथा (बालसाहित्य)
  • मी दिवाणी
  • राका (१९३८). या संग्रहात ’संजीवनी;तील काही निवडक कविता पुन्हा आल्या आहेत.
  • लाडकी लेक (१९७६) - अनुवादित बालकादंबरिका
  • वाळवंटातील वाट
  • संजीवनी (१९३२)
  • संजीवनी (१९७६). निवडक कवितांचा संपादित संग्रह
  • संसार (१९४३)
  • हसू बाई हसू (१९६३-बालकवितासंग्रह)

संजीवनी मराठे यांची गाजलेली ध्वनिमुद्रित गीते

  • अंगाई राजस बाळा, ऐकत धुंदींत स्वप्नांचें संगीत, लागो रे डोळ्यासी डोळा
  • अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे
  • आला स्वप्‍नांचा मधुमास
  • आळविते मी तुला विठ्ठला
  • जिवाचा जिवलगा नंदलाला
  • या गडे हासू या
  • शांत सागरी कशास उठविलीस वादळे
  • सकल मिळुनि हसुनि
  • सत्यात नाहि आले
  • सोनियाचा पाळणा रेशमाचा
  • हसतिल मजला कबीर मीरा


पुरस्कार

महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.