Jump to content

"सदाअत हसन मंटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पश्चिम पंजाबमध्ये जन्मलेले सदाअत हसन मंटो - लेखनभेद - स‍आदत, सादत (...
(काही फरक नाही)

१८:३६, ७ मार्च २०१४ ची आवृत्ती

पश्चिम पंजाबमध्ये जन्मलेले सदाअत हसन मंटो - लेखनभेद - स‍आदत, सादत (जन्म : समराला, पाकिस्तान, ११ मे १९१२; मृत्यू : १९५६) हे एक संवेदनशील, प्रतिभाशाली साहित्यिक होते. त्यांनी अडीचशे पेक्षा जास्त कथा, शेकडो श्रुतिका, स्मृतिचित्रे, कादंबरी, अनुवाद, अनेक लेख व निबंध लिहिले. त्यांच्या लेखनात जीवनातील संघर्ष, जाणिवा यांचे उघडपणे दर्शन होते. त्यांच्या आयुष्यातील भळाळती जखम म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणी.दोन्ही देशांतील दंगली, जाळपोळ, हिंसा, धर्मांधतेने व्यथित केले. या काळातील वेदनामय घटना त्यांनी कथांमधून व्यक्त केल्या आहेत. समाजातील घटनांचे सत्य आणि विद्रूप त्यांनी निर्भीडपणे मांडले.

माणसातील विवेक, माणुसकी जागृत करणाऱ्या या मंटोचे आत्मकथन डॉ.नरेंद्र मोहन यांनी चितारले आहे. डॉ. वसुधा सहस्रबुद्धे यांनी 'मंटो : तप्त सूर्याचा संताप' या पुस्तकामधून ते मराठीत आणले आहे.

२०१० साली पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाने, ’पावलांचा आवाज' ही सदाअत हसन मंटो यांच्या एका कथेवर आधारित एकांकिका सादर केली. नाट्यप्रयोगामधील एका विशिष्ट दृश्‍याला आक्षेप घेऊन, काही विद्यार्थ्यांनी प्रयोगामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला; पण "महाराष्ट्र कलोपासक'ने व्यत्यय आणणाऱ्या विद्यार्थी प्रेक्षकांना नाट्यमंदिराबाहेर जायला सांगून प्रयोग शेवटपर्यंत होऊ दिला.

किरण येले यांनी सदाअत मंटोच्या दोन कथांवर आधारलेले ‘जल गयी पतंगे’ हे दोन अंकी नाटक लिहिले. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातून हे नाटक प्रथम आले आणि अंतिम फेरीत उत्कृष्ट संहिता म्हणून त्याचा गौरव झाला.


आणखी मराठी पुस्तके

  • मंटोच्या कथा - टोबो टेकसिंह आणि इतर कथा (फाळणी संदर्भातील १० कथा. मूळ लेखक मंटो. अनुवाद सदा कऱ्हाडे)
  • मंटो : तप्त सूर्याचा संताप (मूळ लेखक डॉ. नरेंद्र मोहन. अनुवाद डॉ. वसुधा सहस्रबुद्धे)
  • मंटो हाजिर हो (मूळ लेखक मंटो. अनुवाद चंद्रकांत भोंजाळ). मंटोंच्या ज्या कथांवर अश्लीलतेसाठी खटले भरले त्या कथा आणि खटल्यांची हकीकत)
  • सदाअत हसन मंटो (लेखक : वारिस अल्वी)