Jump to content

"फ्लाय ॲश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाचे मोठय़ा प्रमाणावर ज्वलन केल्य...
(काही फरक नाही)

१८:३०, ६ मार्च २०१४ ची आवृत्ती

औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाचे मोठय़ा प्रमाणावर ज्वलन केल्यानंतर निर्माण होणारी राख म्हणजे 'फ्लाय अॅश'. ही राख हलकी आणि अगदी बारीक कणांनी बनलेली असते. ती हवेत तरंगत राहात असल्यामुळे तिचा वेळीच योग्य वापर न झाल्यास ती आरोग्यास हानिकारक ठरते. ही राख कारखान्यांच्या चिमणीतून बाहेर पडण्यापूर्वीच ती काही विशिष्ट प्रकारच्या गाळण्यांचा वापर करून साठवली जाते. हलक्या विटा बनवण्यासाठी या राखेचा वापर होतो.

पर्यावरणाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणारी 'फ्लाय अॅश' वापरून बांधकामाच्या विटा बनवण्याचा उद्योग महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नाशिक येथे चालतो. पुणे जिल्ह्यात सुमारे १०० ते १२५ उद्योजक फ्लाय अॅशपासून विटा बनवण्याचा व्यवसाय करत असून या विटांनी लाल मातीच्या विटांची बाजारपेठ जवळजवळ ९० टक्के काबीज केली आहे असे सांगितले जाते.

फ्लाय अॅशपासून सध्या विटा आणि लाइट वेट ब्लॉक्स ही दोन उत्पादने बनवली जातात. फ्लाय अॅशची नेहमीची वीट साधारणपणे ९ इंचांची असते, तर लाइट वेट ब्लॉक २ फूट लांबीचे असतात. हे ब्लॉक्स वापरून बांधकाम लवकर होते आणि सिमेंटही तुलनेने कमी लागते. त्यामुळे ते फ्लाय अॅश विटांपेक्षा थोडे महाग असले तरी लोकप्रिय झाले आहेत.