Jump to content

"शामळदास गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
शामळदास गांधी (जन्म : राजकोट, इ.स. १८९७; मृत्यू : ८ मार्च १९५३) हे एक गुजराथी पत्रकार होते. गुजराथी भाषेतील दैनिक ’मुंबई समाचार’ या वृत्तपत्रातून त्यांची पत्रकारिता सुरू झाली. पुढे ते ’जन्मभूमि’ या वर्तमानपत्राचे संपादक झाले. शामळदास गांधींनी ’वंदे मातरम्‌’ नावाचे स्वतःचे वर्तमानपत्र सुरू केले होते.

१९४७साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी देशातील अनेक संस्थाने भारतात सामील होण्यास तयार नव्हती. जुनागड संस्थान हे त्या संस्थानांपैकी एक. जुनागडचा नवाब महोब्बतखान याला आपले संस्थान पाकिस्तानात सामील व्हावे असे वाटत होते.
१९४७साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी देशातील अनेक संस्थाने भारतात सामील होण्यास तयार नव्हती. जुनागड संस्थान हे त्या संस्थानांपैकी एक. जुनागडचा नवाब महोब्बतखान याला आपले संस्थान पाकिस्तानात सामील व्हावे असे वाटत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी त्यात जुनागड संस्थान हे गोडीगुलाबीने सामील होईल अशी शक्यता नव्हती.

जुनागडची ८० टक्के प्रजा हिंदू होती. असे असून तेथील दिवाण सर शाहनवाज भुत्तो याच्या सल्ल्याप्रमाणे जुनागडच्या नवाबाने आपल्या संस्थानाचे पाकिस्तानमध्ये २२ एप्रिल १९४७ रोजी विलीनीकरण केले. [[वल्लभभाई पटेल]] यांनी ते विलीनीकरण रद्द करून भारतात येण्यासाठी नवाबावर दबाव टाकायला सुरुवात केली होती. असे असूनही, भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी त्यात जुनागड संस्थान हे गोडीगुलाबीने सामील होईल अशी शक्यता नव्हती.
जुनागडची ८० टक्के प्रजा हिंदू होती. असे असून तेथे दिवाण असलेले सर शाहनवाज भुत्तो (हे पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले) यांच्या सल्ल्याप्रमाणे जुनागडच्या नवाबाने आपल्या संस्थानाचे पाकिस्तानमध्ये २२ एप्रिल १९४७ रोजी विलीनीकरण केले. [[वल्लभभाई पटेल]] यांनी ते विलीनीकरण रद्द करून जुनागड संस्थानाने भारतात यावे यासाठी नवाबावर दबाव टाकायला सुरुवात केली होती.

==आरज़ी हुकूमत==
==आरज़ी हुकूमत==
मुंबईत रहात असलेले शामळदास गांधी यांनी मुंबईतील जुनागडवासीयांची काळबादेवीजवळील माधवबाग येथे गुरुवारी २५ सप्टेंबर १९४७ रोजी एक सभा घेतली. त्याच सभेत जुनागडसाठी ’आरज़ी हुकूमत’ची (हंगामी सरकारची) स्थापना करण्यात आली.
मुंबईत रहात असलेले शामळदास गांधी यांनी, मुंबईतील जुनागडवासीयांची काळबादेवीजवळील माधवबाग येथे गुरुवारी २५ सप्टेंबर १९४७ रोजी एक सभा घेतली. त्याच सभेत जुनागडसाठी ’आरज़ी हुकूमत’ची (हंगामी सरकारची) स्थापना करण्यात आली.

शामळदास गांधी यांच्या ’आरज़ी हुकूमत’चे (हंगामी सरकार)चे मंत्रिमंडळ असे होते. :-<br />
शामळदास गांधी यांच्या ’आरज़ी हुकूमत’चे (हंगामी सरकार)चे मंत्रिमंडळ असे होते. :-<br />
ओळ ३३: ओळ ३३:

पहा : [[गांधी नावाच्या संस्था]]
पहा : [[गांधी नावाच्या संस्था]]; [[गांधी]]

१२:३८, ३ मार्च २०१४ ची आवृत्ती

शामळदास गांधी (जन्म : राजकोट, इ.स. १८९७; मृत्यू : ८ मार्च १९५३) हे एक गुजराथी पत्रकार होते. गुजराथी भाषेतील दैनिक ’मुंबई समाचार’ या वृत्तपत्रातून त्यांची पत्रकारिता सुरू झाली. पुढे ते ’जन्मभूमि’ या वर्तमानपत्राचे संपादक झाले. शामळदास गांधींनी ’वंदे मातरम्‌’ नावाचे स्वतःचे वर्तमानपत्र सुरू केले होते.

१९४७साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी देशातील अनेक संस्थाने भारतात सामील होण्यास तयार नव्हती. जुनागड संस्थान हे त्या संस्थानांपैकी एक. जुनागडचा नवाब महोब्बतखान याला आपले संस्थान पाकिस्तानात सामील व्हावे असे वाटत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी त्यात जुनागड संस्थान हे गोडीगुलाबीने सामील होईल अशी शक्यता नव्हती.

जुनागडची ८० टक्के प्रजा हिंदू होती. असे असून तेथे दिवाण असलेले सर शाहनवाज भुत्तो (हे पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले) यांच्या सल्ल्याप्रमाणे जुनागडच्या नवाबाने आपल्या संस्थानाचे पाकिस्तानमध्ये २२ एप्रिल १९४७ रोजी विलीनीकरण केले. वल्लभभाई पटेल यांनी ते विलीनीकरण रद्द करून जुनागड संस्थानाने भारतात यावे यासाठी नवाबावर दबाव टाकायला सुरुवात केली होती.

आरज़ी हुकूमत

मुंबईत रहात असलेले शामळदास गांधी यांनी, मुंबईतील जुनागडवासीयांची काळबादेवीजवळील माधवबाग येथे गुरुवारी २५ सप्टेंबर १९४७ रोजी एक सभा घेतली. त्याच सभेत जुनागडसाठी ’आरज़ी हुकूमत’ची (हंगामी सरकारची) स्थापना करण्यात आली.

शामळदास गांधी यांच्या ’आरज़ी हुकूमत’चे (हंगामी सरकार)चे मंत्रिमंडळ असे होते. :-
१. शामळदास गांधी - पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री
२. दुर्लभजी खेताणी - उपपंतप्रधान आणि व्यापारमंत्री
३. नरेंद्र नथवाणी - कायदा आणि सुव्यवस्था यांचे मंत्री
४. भवानीशंकर ओझा - निर्वासितांच्या खात्याचे मंत्री
५. मणिलाल दोषी - गृहमंत्री
६. सुरगभाई वरू - संरक्षणमंत्री
७. रतुभाई अदाणी - सरसेनापती.

आरज़ी हुकूमतची फौज

माधवबागेत झालेल्या सरकार स्थापनेनंतर त्या सभेतील लोकांपैकी काही जणांच्या मदतीने शामळदासांनी एक सशस्त्र लढाऊ फौज बांधली,

जुनागडच्या नवाबाच्या शाही सैन्यात १७७ घोडेस्वार, आघाडीचे (इन्फन्ट्रीचे) २४ सैनिक आणि १०७१ हत्यारबंद शिपाई होते. तर ’आरज़ीं’च्या आझाद जुनागड फौजेत सुमारे ४००० सैनिक होते. सैनिकांसाठी शस्त्रे मिळविण्याचे काम रसिकलाल पारीख यांनी हाती घेतले होते.

’आरज़ी हुकूमत’ एक ’आझाद जुनागड रेडियो’ नावाचे नभोवाणी केंद्र चालवत होते. त्या केंद्रावरून ’चलो जुनागड एकसाठ’ आणि ’आरज़ी हुकूमत ज़िंदाबाद’ या ध्वनिमुदिका सतत वाजविण्यात येत.

२४ ऑक्टोबर १९४७ रोजी शामळदास गांधी यांच्या फौजेने जुनागड संस्थानाच्या पूर्व सीमेवर हल्ला करून ११ गावे जिंकली.

सन्मान

  • शामळदास गांधी यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे नाव जुनागडमधील टाऊन हॉलला दिले गेले आहे.
  • शामळदास गांधीच्या नावाचे एक महाविद्यालय भावनगरमध्ये आहे.
  • मुंबईच्या धोबी तलावनजीकच्या ’प्रिन्सेस स्ट्रीट’चे नाव बदलून ते शामळदास गांधी रोड असे करण्यात आले आहे.

पहा : गांधी नावाच्या संस्था; गांधी

(अपूर्ण)