Jump to content

"गोविंद आफळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गोविंद रामचंद्र आफळे (जन्म : १५ फेब्रुवारी १९१७) हे एक मराठीतून की...
(काही फरक नाही)

१८:४३, २६ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

गोविंद रामचंद्र आफळे (जन्म : १५ फेब्रुवारी १९१७) हे एक मराठीतून कीर्तने करणारे परंपरागत कीर्तनकार आहेत. त्यांचे पूर्वजही कीर्तनकार होते आणि सुपुत्र चारुदत्त आफळे हेही कीर्तनकार आहेत. गोविंदस्वामी आफळे यांना राष्ट्रीय कीर्तनकार म्हटले जाते, कारण त्यांची कीर्तने केवळ धार्मिक आणि पौराणिक विषयांवरच नसून अनेक सामाजिक आणि राजकीय गोष्टी त्यांच्या कीर्तनांचे विषय असत. त्यांनी कीर्तनाचे विशेष शिक्षण पुण्याच्या नारद मंदिरात घेतले. तिथेच त्यांची वर्षभर कीर्तने होत असत. नभोवाणीवरही आफळेस्वामींची कीर्तने नित्यनियमाने होत असत.

गोविंद आफळे हे एक मराठी लेखक, नाटककार, पुस्तक प्रकाशक, पोवाडे लिहिणारे आणि गाणारे शाहीर आणि नाट्य‍अभिनेते होते. आफळे कुटुंब हे मूळचे सातारा जिल्ह्यातील माहुली गावाचे असल्याने आफळेस्वामींनी ’आम्ही माहुलीकर’ नावाचे एक आत्मकथनात्मक पुस्तकही लिहिले आहे. गंना. कोपरकरांनी संपादित केलेल्या ’कीर्तनाची प्रायोगिकता’ नावाच्या ग्रंथाचे गोविंदराव आफळे उपसंपादक होते.

गोविंद रामचंद्र आफळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • आम्ही आहो बायका (नाटक)
  • आर्यांचे स्वाहाकार
  • उपासना
  • टाकीचे घाव
  • तू बायको ना त्याची? (नाटक)
  • प्रतापगडचा रणसंग्राम (नाटक)
  • बैल गेला नि झोपा केला (नाटक). या नाटकात गोविंदस्वामी स्वतःच भूमिका करीत.
  • महाकवि कालिदास (नाटक) - संगीत दिग्दर्शन : चारुदत्त आफळे
  • माहुलीची माणसं
  • संसार तरंग
  • सावरकर गाथा (लेखन आणि प्रकाशन :गोविंद आफळे)
  • स्वराज्य संग्राम