"वसंतराव पाडगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: वसंतराव पाडगावकर (जन्म : हुबळी, १६ मार्च १९१६; मृत्यू : पुणे, ३० जाने... |
(काही फरक नाही)
|
११:०२, ३ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती
वसंतराव पाडगावकर (जन्म : हुबळी, १६ मार्च १९१६; मृत्यू : पुणे, ३० जानेवारी २०१४) हे बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी महाव्य्वस्थापक होते.
बी.एस्सी. ही पदवी घेऊन पाडगावकर बँकेत नोकरीला लागले. नंतर ते पुण्यात आले आणि १९५३च्या सुमारास महाराष्ट्र बँकेत रुजू झाले. त्यांना मुळातच मैदानी खेळांची आवड होती. बँक ऑफ महाराष्ट्राच्या खो-खो आणि हुतुतू संघांतून ते खेळत असत.
बँकेत नोकरी चालू असताना क्रीडाप्रेमी पाडगावकरांनी कुस्ती, क्रिकेट, खो-खो, हुतुतू खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांना महाराष्ट्र बँकेच्या नोकरीत घेतले. यशवंतराव मोहिते आणि वसंतराव पाडगावकर यांनी महिलांच्या क्रिकेटला फार मोठे पाठबळ दिले. म्हणूनच महाराष्ट्रात महिला क्रिकेटचा मोठा विस्तार होऊ शकला.
सामाजिक कार्याची पाडगावकरांना मनापासून आवड होती. पुण्यातील बालसुधारगृहाचे ते काही वर्षे विश्वस्त होते.
वसंतराव पाडगावकर जे पत्रकार दिलीप पाडगावकर आणि पुणे जिल्हा जलतरण संघटनेच्या नीता तळावलीकर यांचे वडील होत.