Jump to content

"शरच्चंद्र दामोदर गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|डॉ. शरच्चंद्र विष्णू गोखले}} डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले (जन...
(काही फरक नाही)

२१:३०, १९ जानेवारी २०१४ ची आवृत्ती


डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले (जन्म : पुणे, २२ सप्टेंबर १९२५; मृत्यू : पुणे, १५ जानेवारी २०१३) हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मराठी समाजशास्त्रज्ञ होते.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून ' मास्टर ऑफ सोशल वर्क ' ही पदवी घेतल्यानंतर सरकारी सेवेच्या माध्यमातून त्यांनी कार्याला प्रारंभ केला. समाजकल्याण खात्यातील वरिष्ठ पद सोडून त्यांनी पूर्णवेळ समाजोपयोगी कामाला वाहून घेतले.पुण्यातील कास्प (Community Aid and Sponsorship Programme), आंतरराष्ट्रीय लेप्रसी युनियन व आंतराराष्ट्रीय दीर्घायू युनियन या संस्थांचे ते संस्थापक-विश्वस्त होते. पुण्यातीलच ’केसरी’ या वृत्तपत्राचे ते एकेकाळी संपादक होते. शरच्चंद्र गोखले हे मान्यवर लेखक होते. युनायटेड नेशन्स, युनिसेफ जागतिक आरोग्य संघटना आणि इतर अनेक जागतिक पातळीवरील संघटनांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.

समाजातील निष्पाप निराधार गरीब मुले, अव्हेरलेले कुष्ठरोगी, आणि बदलत्या जीवनशैलीतील उपेक्षित ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी डॉ. शरच्चंद्र गोखले यांनी आस्थेने, तळमळीने काम केले. अशा लोकांना समाजाने स्वीकारावे, सन्मानाने जगू द्यावे यांसाठी ते आयुष्यभर झटले.

केंद्र आणि राज्य सरकारांच्या अनेक समित्यांवर सल्लागार आणि समित्यांचे सभासद असताना त्यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना, नंतरचे धोरण आणि विधिविषयक तरतुदी मंजूर करण्यासाठी शरच्चंद्र गोखले यांनी केलेला पाठपुरावा अतुलनीय आहे.

कुटुंब

डॉ शरच्चंद्र गोखले यांना डॉ. अभिजित जोशी व सिद्धार्थ जोशी हे नातू, सौ. अवनी गोखले(जोशी) व सौ मिथिला गोखले(मुकेवार) या नाती आणि सावनी अ.जोशी व इरा ओंकार जोशी या पणत्या आहेत.

डॉ. शरच्चंद्र गोखले यांनी लिहिलेली पुस्तके

  • आकाशपत्रे
  • आढावा सत्तांतराचा
  • झुंज दहशतवादाशी : काश्मीर एक अभ्यास
  • भारताचा राजकीय परिसर
  • समाधानी वार्धक्य

चरित्रग्रंथ

  • मांदियाळी (डॉ. शरच्चंद्र गोखले यांच्या कार्याचे सप्तरंग)-संपादक सविता भावे
  • हे विश्वचि माझे घर(लेखक सविता भावे)


पुरस्कार आणि सन्मान

  • प्राज इंडस्ट्रीजचा महा-आंत्रेप्रेन्युअर पुरस्कार
  • इंटरनॅशनल कौन्सिल फॉर सोशल वेलफेअरचे सन्मानपत्र
  • संयुक्त राष्ट्रसंघातर्फे न्यूयॉर्क आणि बँकॉक येथे विशेष सन्मान
  • आंतरराष्ट्रीय वयोवर्धन संस्थेतर्फे पुरस्कार
  • जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार
  • जे.आर.डी. टाटा यांच्यानंतर युनोच्या जनरल असेंब्लीला संबोधित करण्याची संधी