Jump to content

"उल्हास बापट (प्राध्यापक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुण्यातील प्रोफेसर बापट्स ॲकॅडमी ऑफ इंग्लिश ही एक मे १९९८पासून...
(काही फरक नाही)

००:३७, १ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

पुण्यातील प्रोफेसर बापट्स ॲकॅडमी ऑफ इंग्लिश ही एक मे १९९८पासून पुण्यात लक्ष्मी रोडवर सुरू असलेली नामवंत संस्था आहे. या संस्थेने पहिल्या दहा वर्षात १२००० विद्यार्थ्यांना इंग्रजीत बोलायला शिकविले.

प्राध्यापक बापटांची संस्था डॉक्टरांसाठी, इंजिनिअरांसाठी , वकिलांसाठी आणि चार्टर्ड अकौन्टंट्ससाठी त्यांच्यात्यांच्या गरजांनुसार इंग्रजी बोलण्याचे स्वतंत्र अभ्यासक्रम राबविते.

प्राध्यापक उल्हास बापट एम.ए. एल्‌एल.बी आहेत. ते पुण्याच्या विधी महाविद्यालयात, एस.पी कॉलेजात आणि अमेरिकन फोर्ड फाउंडेशनच्या शैक्षणिक अभ्यासवर्गांत कायदा आणि राज्यशास्त्र या विषयांचे अध्यापक होते. इंग्रजीचे उत्तम ज्ञान असल्याने त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणे सहज शक्य होते, पण त्याऐवजी त्यांनी इंग्रजी शिकविणारी ॲकॅडमी काढली.

उल्हास बापट यांचे पिढीजात चालत आलेले एक सायकलचे दुकान पुण्यात लक्ष्मी रोडवर होते. एके दिवशी अचानक ते दुकान बंद करून त्यांनी त्या जागेवर इंग्रजी शिकविणारी प्रबोधिनी काढली. या संस्थेतून दरवर्षी १००० विद्यार्थी इंग्रजी बोलण्यात तरबेज होऊन बाहेर पडतात. अनेकांना इथल्या शिक्षणाचा ब्रिटिश, अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन स्कॉलरशिप्स मिळवून परदेशी जाण्यासाठी झाला आहे.

जाहीर सभांतून इंग्रजीत कसे बोलावे याचा वर्ग त्यांनी पुण्याच्या एस.पी. कॉलेजात सुरू केला. असा महाविद्यालयीन उपक्रम चालू करणारे उल्हास बापट बहुधा पहिलेच शिक्षक असावेत. त्यानंतर इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांची कमतरता पाहून त्यांनी असे शिक्षक तयार करण्यावर भर दिला. त्यासाठी बापट यांनी लंडनच्या एम्‌टीे्‍एस या संस्थेत एक खास अभ्यासक्रम पुरा केला. त्यांनी केंब्रिज ॲकॅडमी ऑफ इंग्लिशची आणि ऑक्सफर्डच्या सेंट क्लेअर्स कॉलेजचे अभासदत्व मिळविले.

इंग्रजी शिकविणारी संस्था काढली तरी प्रा. उल्हास बापट राज्यशास्त्र विसरले नाहीत. आजही ते भारतीय राज्यघटनेचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात आणि अधिकारवाणीने त्या विषयावरचे लेख मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांमधून लिहितात.