"अरुण बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. '''अरुण बापट''' हे एक जगप्रसिद्ध भूकंपशास्त्रज्ञ आहेत. एकेकाळी त... |
(काही फरक नाही)
|
१६:०७, ३१ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
डॉ. अरुण बापट हे एक जगप्रसिद्ध भूकंपशास्त्रज्ञ आहेत. एकेकाळी ते पुण्याच्या वेधशाळेत त्यांच्या भूकंप विज्ञानाच्या उपशाखेत प्रमुख संशोधन अधिकारी होते.
भारतातील अन्य संस्थांमध्येही अरुण बापट यांनी अधिकाराच्या जागांवर काम केले आहे. त्यांनी अडीचशेहून अधिक शोधनिबंध लिहिले आहेत आणि हिंदी-मराठी नियकालिकांमधून त्यांचे पाचशेहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.
सुनामीच्या संदर्भात अरुण बापट यांनी केलेले स्वतंत्र संशोधन जागतिक स्तरावर मान्यता पावले आहे. २००१सालच्या गुजराथच्या आणि २००४सालच्या अंदमान येथील भूकंपांचे नक्की केंद्रस्थान शोधून काढून त्यांनी त्यांची अचूक तीव्रता मोजली आहे.
जगातील अनेक देश त्यांच्या देशातील भूकंपमापन सामग्री बसविण्यासाठी आणि तिच्या आधुनिकीकरणासाठी अरुण बापट यांचा सल्ला घेतात. त्यांनी भूकंप विज्ञानासंबंधी अधिकारवाणीने केलेली विधाने जगातील अनेक नियतकालिके उद्धृत करतात.
डॉ, अरुण बापट हे सध्या(२०१४साली) ऑस्ट्रेलियामधील अडिलेड विद्यापीठाचे आणि सोफाया गावातील बल्गेरियन विज्ञान प्रबोधिनीचे अभ्यागत प्राध्यापक आहेत.