"ग.वि. केतकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६: ओळ १६:


==गांधी हत्या आणि केतकरांचे भाषण==
==गांधी हत्या आणि केतकरांचे भाषण==
[[महात्मा गांधी]] खून खटल्यातील आरोपींपकी जन्मठेपीची शिक्षा झालेले गोपाळ गोडसे व करकरे दि. १३/१०/१९६४ ला सुटले. ते पुण्यात परतल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी आणि सहविचारी स्नेह्यांनी उद्यान कार्यालयात सत्यनारायण (की सत्यविनायक) केला.
[[महात्मा गांधी]] खून खटल्यातील आरोपींपकी जन्मठेपीची शिक्षा झालेले गोपाळ गोडसे व करकरे दि. १३/१०/१९६४ ला सुटले. ते पुण्यात परतल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी आणि सहविचारी स्नेह्यांनी उद्यान कार्यालयात सत्यनारायण (की सत्यविनायक) केला. त्या वेळी(१२ नोव्हेंबर १९६४ रोजी) ग. वि. केतकरांनी भाषणात सांगितले की, 'गांधींचा खून करण्याचा कट काही व्यक्ती करीत आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष खून होण्यापूर्वीच माहीत झालेले होते व ते आपण काँग्रेसचे पुण्यातील नेते व स्वातंत्र्य-सनिक बाळूकाका कानिटकर यांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर ही माहिती बाळ गं. खेर (मुख्यमंत्री) यांना कळवून योग्य ती उपाययोजना करण्यास सुचवावे असेही मी त्यांना (बाळूकाका कानिटकरांना) सांगितले होते. शासकीय अधिकाऱ्यांनी त्याबाबत काय केले हे मला (केतकरांना) कळू शकले नाही.'


==ग.वि. केतकरांनी लिहिलेली पुस्तके==
==ग.वि. केतकरांनी लिहिलेली पुस्तके==

१७:००, २५ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

गजानन विश्वनाथ केतकर (जन्म : १० ऑगस्ट, १८९८; मृत्यू : ???) हे एक सावरकरवादी, विज्ञाननिष्ठ मराठी पत्रकार होते. लोकमान्य टिळकांचे ते नातू (मुलीचे पुत्र) होते. त्यांचे बालपण व पहिले तारुण्य टिळकांच्या देखरेखीखाली गेले. टिळकांच्या सल्ल्यानुसार कायद्याची परीक्षा (बी.ए. एल‌एल.बी) देऊन ते "केसरी' वर्तमानपत्रात दाखल झाले.

केतकर हिंदुत्ववादी होते. त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा या दोन्ही संघटनांशी संबंध होता. व्यक्तिशः गोळवलकर गुरुजी आणि वि.दा. सावरकर यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध होते. महाराष्ट्र कॉंग्रेसचे चिटणीस या नात्याने केतकरांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन तुरुंगवासही सोसला होता.

महात्मा गांधी यांची गांधीहत्या झाली तेव्हा केतकर "केसरी' पत्राचे संपादक होते. हत्येनंतर सावरकर-गोडसे प्रभृतींवर खटला भरण्यात आला आणि संघावर बंदी आली. केतकरांनी या दोन्ही प्रसंगी हिंदुत्ववादी विचारांची व व्यक्तींची पाठराखण केली. संघावरील बंदी उठवण्यासाठी वल्लभभाई पटेलगोळवलकर गुरुजी यांच्यात यशस्वी शिष्टाई केली.

ग.वि.केतकर हे काही काळ मराठा या इंग्रजी वर्तमानपत्राचेही संपादक होते.

विवाह

केतकरांनी हिंदू धर्मावर निष्ठा असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश महिलेशी, तिला हिंदू करून घेऊन प्रेमविवाह केला, तेव्हा केसरीमधील हिंदुत्ववाद्यांनी त्यांना माफ केले नाही. अमलाबाईंशी विवाह केल्याबद्दल त्यांना ’केसरी'चे संपादकपद सोडावे लागले.

तरुण भारत

तरुण भारत हे दैनिक मुळात साप्ताहिक स्वरूपात २० जानेवारी १९२६ रोजी नागपूर येथे सुरु झाले. २० जानेवारी १९५७ पासून तरुण भारतची पुणे आवृत्ती प्रकाशित होऊ लागली. या आवृत्तीच्या संपादकपदी गजानन विश्वनाथ केतकर यांची नियुक्ती करण्यात आली.

पुण्याच्या ‘तरुण भारत’च्या आवृत्तीचे पहिले संपादक ग. वि. केतकर यांनी ही संपादकत्वाची धुरा, सुमारे सात वर्षे म्हणजे १९६४ पर्यंत आपल्या खांद्यावर वाहिली. पण गांधीहत्येच्या संदर्भात केतकरांनी केलेल्या काही विधानांमुळे त्यांच्यावर सरकारी रोष ओढवला. त्यामुळे त्यांनी संपादकपद सोडले.

गांधी हत्या आणि केतकरांचे भाषण

महात्मा गांधी खून खटल्यातील आरोपींपकी जन्मठेपीची शिक्षा झालेले गोपाळ गोडसे व करकरे दि. १३/१०/१९६४ ला सुटले. ते पुण्यात परतल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी आणि सहविचारी स्नेह्यांनी उद्यान कार्यालयात सत्यनारायण (की सत्यविनायक) केला. त्या वेळी(१२ नोव्हेंबर १९६४ रोजी) ग. वि. केतकरांनी भाषणात सांगितले की, 'गांधींचा खून करण्याचा कट काही व्यक्ती करीत आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष खून होण्यापूर्वीच माहीत झालेले होते व ते आपण काँग्रेसचे पुण्यातील नेते व स्वातंत्र्य-सनिक बाळूकाका कानिटकर यांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर ही माहिती बाळ गं. खेर (मुख्यमंत्री) यांना कळवून योग्य ती उपाययोजना करण्यास सुचवावे असेही मी त्यांना (बाळूकाका कानिटकरांना) सांगितले होते. शासकीय अधिकाऱ्यांनी त्याबाबत काय केले हे मला (केतकरांना) कळू शकले नाही.'

ग.वि. केतकरांनी लिहिलेली पुस्तके

  • ख्रिस्ती ड्रामा
  • गीताबीज
  • गीतार्थचर्चा
  • मर्मभेद
  • रणझुंझार डॉ. पां.स. खानखोजे यांचे चरित्र; याशिवाय अनेक छोटेखानी चरित्रे
  • लोकमान्यांची भाषाशैली
  • हिंदुत्वाची राष्ट्रीय मीमांसा

केतकरांची प्रकाशित चरित्रे

  • ’पत्रकार-महर्षी ग.वि. केतकर’ (लेखक : अरविंद केतकर)