Jump to content

"वासुदेव वामन बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वासुदेव वामन बापट ऊर्फ बापट गुरुजी (जन्म : २९ ऑगस्ट, १९५३) हे यज्ञक...
(काही फरक नाही)

२३:१७, २४ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

वासुदेव वामन बापट ऊर्फ बापट गुरुजी (जन्म : २९ ऑगस्ट, १९५३) हे यज्ञकर्म आणि तंत्र-मंत्रासारखी साधने यांच्यावर विश्वास ठेवणारे आणि त्यांचा प्रचार करणारे एक आधुनिक गुरुजी आहेत. त्यांचे पूर्वज दशग्रंथी व घनपाठी विद्वान होते. बापट गुरुजी सन १९८१ ते १९९३ या काळात स्वामी विज्ञानानंद ह्यांच्य़ा ज्ञानमार्गाचा अभ्यास करत होते. वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे महाराज व स्वामी विज्ञानानंद यांच्या प्रेरणेने बापट गुरुजींनी १९९४पासून सामुदायिक यज्ञांना सुरुवात केली. त्यांनी २०१३सालापर्यंत सुमारे २०० यज्ञ केले आहेत.

बापट गुरुजींनी नर्मदा परिक्रम केलीआहे व २५० लोकांना बरोबर घेऊन गंगा परिक्रमाही केली आहे. त्यांनी इ.स. २०००मध्ये स्थापन केलेले ’प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र’ मुंबई जवळच्या कल्याण येथे आहे.

यज्ञ, तंत्र-मंत्र या विषयांवर बापट गुरुजींनी काही पुस्तके लिहिली आहेत. बहुतेक पुस्तके भाषांतरित आहेत.

बापट गुरुजींची पुस्तके

  • (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र (मराठी, हिंदी, गुजराथी) (मूळ लेखक वासुदेवानंद सरस्वती-टेंबे महाराज)
  • करुणात्रिपदी (मूळ लेखक वासुदेवानंद सरस्वती-टेंबे महाराज)
  • चित्तसद‌्बोध - नक्षत्रमाला स्तोत्र (मूळ लेखक वासुदेवानंद सरस्वती-टेंबे महाराज)
  • || नमो गुरवे वासुदेवाय || - मंत्र व यंत्र साधना
  • नर्मदा नित्यपाठ
  • यज्ञरहस्य (मराठी, हिंदी)
  • श्रीगंगा गीतावली
  • श्री गुरुस्तुति (मूळ लेखक वासुदेवानंद सरस्वती-टेंबे महाराज)
  • श्रीदत्तात्रेयस्तोत्र (मूळ लेखक वासुदेवानंद सरस्वती-टेंबे महाराज)
  • श्रेष्ठ मंत्रशक्ती
  • संतोपदेश ( भाग १ ते ५) -
    • १. वर्तमान एक संधिकाल
    • २. ज्ञानदीप उजळू दे
    • ३. सुखाचा शोध
    • ४. गुरु तोचि देव
    • ५. साधना मार्ग प्रदीप
  • हरी ओम…!