"रमा मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. रमा मराठे (पूर्वाश्रमीच्या मेधा वसंत मुळ्ये) या एक होमिओपॅथीच... |
(काही फरक नाही)
|
००:१५, १ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती
डॉ. रमा मराठे (पूर्वाश्रमीच्या मेधा वसंत मुळ्ये) या एक होमिओपॅथीच्या मानसोपचार करणाऱ्या डॉक्टर असून मराठी लेखिकाही आहेत. त्यांचे पति रविकिरण मराठे हे बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांचे रुग्णालय बेळगावमध्ये आहे. सामान्य वाचकांसाठी रमा मराठे यांनी मानसिक दुखणी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या सांसारिक अडचणी यांविषयी सल्ला देणारी अनेक पुस्तके लिहिली आहेत. यांतली बहुतेक पुस्तके औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत.
डॉ रमा मराठे यांनी लिहिलेली पुस्तके
- असे घडवू या मुलांचे व्यक्तिमत्त्व (मार्गदर्शनपर)
- औषधाविना आरोग्य (सहलेखक :डॉ. रवी मराठे)
- चॅम्पियन व्हा (बालवाचकांसाठी मार्गदर्शनपर)
- तुमच्या डॉक्टरांचे आहारतत्त्वांविषयीचे अज्ञान तुमच्यासाठी प्राणघातक ठरू शकते
- तो आणि ती (भाषांतरित)
- तो दोघं (कथासंग्रह)
- ब्रेन प्रोग्रॅमिंग (मेहता प्रकाशन)
- मनगंगेच्या काठावरती (आठवणी)
- रंग सुखाचे (मार्गदर्शनपर)
- रहस्य (कथासंग्रह)
- स्वभावाला औषध आहे
- हसत जगावं