"श्रीधर कृष्ण शनवारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
(काही फरक नाही)
|
१८:२०, २८ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
श्रीधर कृष्ण शनवारे (जन्म :ऑक्टोबर ५, इ.स. १९३५; मृत्यू : ऑक्टोबर २७ इ.स. २०१३ हे महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातले एक मराठी कवी होते.
नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे अध्यापन केले. १९९६ साली दर्यापूरला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
कवी शनवारे यांची ग्रंथरचना
- अतूट (नाटक. मूळ शरच्चंद्र चटोपाध्याय यांची ’रामेर’ ही कथा)
- आतून बंद बेट (काव्यसंग्रह)
- उन्ह उतरणी (काव्यसंग्रह)
- उस यात्रा की खोज में (हिंदी अनुवाद)
- कथाकार वामनराव चोरघडे समीक्षाग्रंथ
- कोलंबसाची इंडिया व पायावर चक्र (प्रवास वर्णन)
- जातो माघारा (काव्यसंग्रह)
- तळे संध्याकाळचे (काव्यसंग्रह)
- तीन ओळीची कविता (काव्यसंग्रह)
- थांग अथांग तळे (काव्यसंग्रह)
- थेंब थेंब चिंतन चिंतन)
- प्रेमचंदांची निवडक कविता (अनुवाद)
- राक्षसाचे वाडे (बालसाहित्य)
- सरवा (काव्यसंग्रह)
पुरस्कार
- उन्ह उतरणी या कवितासंग्रहाला कविवर्य केशवसुत पुरस्कार
सन्मान
- विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (दर्यापूर १९९६)