Jump to content

"पंडितराव तात्याराव देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''पंडितराव तात्याराव देशपांडे''' (जन्म : अजनसोंड(लातूर जिल्हा), नोव...
(काही फरक नाही)

२३:१५, २६ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

पंडितराव तात्याराव देशपांडे (जन्म : अजनसोंड(लातूर जिल्हा), नोव्हेंबर १९३० - हयात) हे एक देशभक्त शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, आणि लेखक आहेत..

त्यांच्या लहानपणी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या आईने त्यांना वाढवले. मेहनती, उपक्रमशील आणि हरहुन्नरी विद्यार्थी अशी त्यांची ओळख होती. पंडितरावांनी उस्मानिया विद्यापीठातून एम.ए., एम.एड.पर्यंतचे शिक्षण घेतले.

त्या काळी मराठवाडा रझाकारांच्या छायेखाली होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून रझाकारांच्या अन्याय्य व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या चळवळीत पंडितराव विद्यार्थीदशेतच सहभागी झाले. मूल्य म्हणून पंडितराव देशपांडे यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला.

रामतीर्थ विचार मंच, ज्येष्ठ नागरिक संघ, पेन्शनर्स असोसिएशन इत्यादी व्यासपीठांच्या माध्यमांतून त्यांनी वंचित, शोषित गटातील विद्यार्थ्यांसाठी कामे उभी केली. पाच मुलींचा सांभाळ करताना आई आणि बाबा दोन्ही भूमिका त्यांनी समर्थपणे पेलल्या.

महाराष्ट्र शासनाच्या उत्तम पुस्तक निवड समितीने शालेय संदर्भासाठी देशपांडे यांच्या पुस्तकांना मान्यता दिली आहे..

पंडितराव तात्याराव देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • ओवी ज्ञानेश्‍वराची
  • क्रांतिकारकांचे महामेरू सावरकर
  • मुलांचे रामतीर्थ
  • स्वातंत्र्य समरकथा
  • स्वातंत्र्यवीर सावरकर - चित्रमय दर्शन
  • .स्वातंत्र्याचा इतिहास एक सिंहावलोकन
  • ज्ञान पाथेय

पुरस्कार

  • ज्येष्ठ नागरिक महासंघाचा (फेस्कॉम) आदर्श पिता पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार.