Jump to content

"राम जगन्नाथ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३५: ओळ ३५:
* रामजोशी सोलापूरकर, पंतांचे मित्रमंडळ, मोरोपंत चरित्र आणि काव्यविवेचन (ल.रा.पांगारकर)
* रामजोशी सोलापूरकर, पंतांचे मित्रमंडळ, मोरोपंत चरित्र आणि काव्यविवेचन (ल.रा.पांगारकर)
* रामजोशी : मराठी शाहीर (श्री.म. वर्दे)
* रामजोशी : मराठी शाहीर (श्री.म. वर्दे)

==चित्रपट==
* ’शाहीर रामजोशी’ : व्ही.शांताराम यांनी काढलेला मराठी चित्रपट. यात मराठी गायक [[जयराम शिलेदार]] यांनी रामजोशींची भूमिका केली होती.


[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी कवी]]

१५:१२, १० ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

लोकशाहीर रामजोशी

राम जगन्नाथ जोशी (जीवनकाळ: १७६२ ते १८१३)< गाव: सोलापूर (महाराष्ट्र्).
'सुंदरा मनामधी भरली' ही व अशाच प्रसिद्ध तमाशाप्रधान लावण्यांचा रचयिता व गायक. रामजोशींच्या फडात बया आणि चिमा अशा दोन नाचणाऱ्या तमासगिरिणी असत.

रामजोशींचे थोरले बंधू म्हणजे मुद्गलशास्त्री. हे नावाजलेले शास्त्री आणि पुराणिक होते. वडील निर्वतल्यावर रामजोशींना त्यांनीच सांभाळले. रामजोशींना लहानपणापासूनच तमाशाचा छंद होता. त्यामुळे त्यांना शिक्षणात रस नव्हता. घरासमोरच धोंडिबा शाहिराचा फड होता. रामजोशी नेहमी तिकडे जाऊन बसत. त्यामुळे त्यांना लावण्या रचण्याचा व डफावर गाणी म्हणण्याचा षोक लागला. वयाची विशी उलटून गेली तरी संस्कृत भाषेचा गंध नसलेल्या रामजोशींना, मुद्गलशास्त्रींनी घरातून घालवून दिले. तेव्हा रामजोशी नेसत्या वस्त्रानिशी पंढरपूरला गेले आणि त्यांनी तिथे वेदशास्त्रसंपन्न बाबा पाध्ये यांचे शिष्यत्व पत्करून काव्यालंकार आणि व्याकरणशास्त्र यांचा अभ्यास केला.

गुरूंची अनुज्ञा घेऊन रामजोशी सोलापूरला परतले. तेथे वडील बंधू आजारी असल्याचे पाहून रामजोशींनी त्यांच्याऐवजी देवळांत पुराण सांगायला सुरुवात केली. पुराण सांगण्याची त्यांची अनोखी धाटणी पाहून सोलापूरकर आणि मुद्गलशास्त्रीही प्रसन्न झाले. इ.स. १७९३पासूनच्या पुढील काळात रामजोशी उत्तम कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध पावले.

रामजोशींचा बारामतीला बाबुजी नाइकांच्या वाड्यात तमाशा होता. त्यावेळी त्यांनी गायलेल्या ’भला जन्म हा तुला लाधला’ आणि ’दो दिवसांची तनु ही साची’ या दोन वैराग्यपर कवनांनी तिथे असलेले मोरोपंत संतुष्ट झाले. त्या दिवसापासून मोरोपंत आणि रामजोशी यांच्यामध्ये एकमेकांविषयी आदर व स्नेह वाटू लागला, आणि उत्तरोत्तर तो वाढतच गेला. रामजोशींनी मोरोपंतांच्या आर्या आपल्या कीर्तनांतून लोकप्रिय केल्या. या पुढील काळातील रामजोशींच्या काव्यरचनेवर मोरोपंतांची बरीच छाप आहे.

संस्कृताध्ययन, यमक-अनुप्रासांची लयलूट, संस्कृत-प्राकृत शब्दांच्या मिश्रणाने घडून आलेली भाषेची सजावट, शीघ्रकवित्व, समयसूचकता आणि प्रभावी वक्तृत्व आदी गुणांमुळे रामजोशी यांची कीर्तने अतिशय लोकप्रिय झाली. एकदा त्यांचे कीर्तन ऐकून एका सावकाराने त्यांना ५ हजाराचे बक्षीस दिले.

शंकराचार्यांनी रामजोशींना बहिष्कृत करावे असा पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांचा आग्रह होता. परंतु शंकराचार्यांसारख्या पुरुषाला रामजोशींनी आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणाने आणि काव्यरचनेने संतुष्ट केले. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पुण्यात काशीरामेश्वरपर्यंत ज्यांचा लौकिक पसरला होता असे नीलकंठशास्त्री थत्ते नावाचे एक याज्ञिक पंडित होते. पुण्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्या सभेत नीलकंठशास्त्री आहेत, तेथेच रामजोशींचे कीर्तन ठेवले. ते जाणून रामजोशींनी यज्ञशास्त्राची जमेल तितकी माहिती गोळा केली, आणि त्या सभेत त्या माहितीचा उपयोग करून बसविलेल्या लावण्या कटिबंधाच्या चालीवर म्हटल्या. त्या ऐकून थत्तेशास्त्रींनी खुश होऊन आपल्या अंगावरची शाल रामजोशींना पांघरून त्यांचा गौरव केला.

सन्मान आणि गौरव

  • सांगली संस्थानचे अधिपती चिंतामणराव अप्पा यांनी रामजोशींचे कीर्तन ऐकून त्यांचा सत्कार केला होता.
  • मोरोपंतांनी रामजोशींना ’कविप्रवर’अशी पदवी दिली होती.
  • एका सावकाराने रामजोश्यांचे कीर्तन ऐकून त्यांना पाच हजाराचा रोखा फाडून दिला.
  • इचलकरंजीच्या घोरपड्यांच्या वाड्यात आपल्या बिदागीबद्दल चाललेली कुजबूज ऐकून रामजोशांनी आपल्या कवनात तसा उल्लेख केला. ते ऐकून घोरपडे यांनी प्रसन्न होऊन मोठीच बिदागी दिली.
  • नीलकंठशास्त्री थत्ते नावाच्या पुण्यातील विद्वानाने रामजोशींना आपल्या अंगावरची शाल पांघरून त्यांचा गौरव केला.

रामजोशींचे प्रकाशित साहित्य

  • रामजोशीकृत लावण्या, भाग १ व २. (संपादक : रा.श्री. गोंधळेकर)
  • रामजोशीकृत लावण्या. -’लावणी संग्रह’. (संपादक : शं.तु. शाळिग्राम)
  • पेंढाऱ्यांचा आणि दुष्काळाचा पोवाडा. - ’ऐतिहासिक पोवाडे खंड १. (संपादक : य.न. केळकर)
  • पेशव्यांच्या शुक्रवारवाड्याचा पोवाडा. - ’ऐतिहासिक पोवाडे खंड २. (संपादक य.न.केळकर)
  • पुण्याचा पोवाडी/ब्राह्मणी राज्य जोरदार. - ऐतिहासिक पोवाडे खंड १. (संपादक : य.न. केळकर)
  • सुभद्रेचा पोवाडा. - ’तंतकवि तथा शाहीर’. (संपादक : य.न. केळकर)

चरित्रग्रंथ

  • महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - रामजोशी (लेखक : शिरीष गंधे; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
  • रामजोशी (लेखक : य.न. केळकर)
  • रामजोशी चरित्रावर आणखी प्रकाश. - ’ऐतिहासिक पोवाडे खंड ३. (संपादक य.न.केळकर)
  • रामजोशी सोलापूरकर, पंतांचे मित्रमंडळ, मोरोपंत चरित्र आणि काव्यविवेचन (ल.रा.पांगारकर)
  • रामजोशी : मराठी शाहीर (श्री.म. वर्दे)

चित्रपट

  • ’शाहीर रामजोशी’ : व्ही.शांताराम यांनी काढलेला मराठी चित्रपट. यात मराठी गायक जयराम शिलेदार यांनी रामजोशींची भूमिका केली होती.