"श्रीनिवास दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
(काही फरक नाही)
|
११:४०, ९ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
श्रीनिवास हरी दीक्षित (जन्म : इ.स. १९२०; मृत्यू ७ ऑक्टोबर, इ.स. २०१३) हे तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि प्राध्यापक होते. त्यांनी एमएच्या परीक्षेत मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकाविले होते.
श्रीनिवास दीक्षित यांनी कोल्हापूरचे राजाराम कॉलेज, धारवाडचे कर्नाटक कॉलेज, पुणे आदी ठिकाणी अध्यापनाचे काम केले. तत्त्वज्ञान हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय होता. १९६९मध्ये धारवाडमध्ये भरलेल्या अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषेदेचे ते विभागीय अध्यक्ष होते, तसेच महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद या संस्थेची स्थापना करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. तर्कशास्त्र, भारतीय तत्त्वज्ञान, नीतिमीमांसा, इहवाद, धर्म आणि तत्त्वज्ञानातील समस्या अशा विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
श्रीनिवास दीक्षित यांनी लिहिलेली पुस्तके
- इंद्रधनुष्य
- तर्कशास्त्र
- भारतीय तत्वज्ञान