Jump to content

"जनार्दन सखाराम करंदीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ज.स. करंदीकर (पूर्ण नाव जनार्दन सखाराम करंदीकर) हे पुण्याहून प्रस...
(काही फरक नाही)

१३:०२, २९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

ज.स. करंदीकर (पूर्ण नाव जनार्दन सखाराम करंदीकर) हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या आणि लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या आणि इ.स. १९२०पासून द्विसाप्ताहिक झालेल्या केसरी या वृत्तपत्राचे इ.स. १९३३ ते १९४६ या काळात संपादक होते. करंदीकर हे गाढे विद्वान होते. त्यांनी महाभारत, गीता आदी ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी लेखांचे एक पुस्तक ’श्री. ज.स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. करंदीकरांनी आपल्या आयुष्यात विविध विषयांवरची १०हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांपैकी काही पुस्तके अशी :-

  • अन्य लोकांप्रत सुगम यात्रा
  • आरंभी
  • कौटिल्य अर्थशास्त्र - दोन खंड
  • गणेशोत्सवाची ६० वर्षे
  • गीता तत्त्वमंजरी अर्थात निर्लेप कर्मशास्त्र
  • नरसिंह चिंतामण केळकर यांच्या आठवणी
  • भोपटकर गुणगौरव ग्रंथ (संपादित)
  • महाभारत
  • महाभारत कथाभाग आणि शिकवण
  • श्रीसमर्थ चरित्र
  • हिंदुत्ववाद