Jump to content

"मधुरा कोरान्ने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. मधुरा जयप्रकाश कोरान्ने या मराठीतील एक लेखिका आहेत. मराठी न...
(काही फरक नाही)

००:१२, २२ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

प्रा. मधुरा जयप्रकाश कोरान्ने या मराठीतील एक लेखिका आहेत. मराठी नाटक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांची अनेक पुस्तके फक्त ’नाटक’ या विषयावरच आहेत. केतकी अविनाश कुलकर्णी या त्यांच्या कन्या आहेत.

डॉ. मधुरा कोरान्ने, एम.ए. पी‍एच.डी, या पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये इ.स.१९८९पासून मराठीच्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी पीएच.डी.साठी ’समीक्षा’ या विषयावर प्रबंध सादर केला होता.

डॉ. मधुरा कोरान्ने या वक्त्या आहेत. नाशिक येथील यशवंतराव महाराज पटांगणात आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘आधुनिक मराठी नाटकातील स्त्री प्रतिमा’ या विषयावर त्यांचे भाषण झाले होते. मराठी दूरचित्रवाहिनी-सह्याद्रीवर मधुरा कोरान्ने यांची ’आधुनिक नाटकातील स्त्री प्रतिमा’ ह्या विषयावर मुलाखत घेतली गेली होती. दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित ’लेखिका संमेलन २०१२’ मध्ये ’स्त्री नाटककारांची नाटके’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

डॉ. मधुरा कोरान्ने यांनी लिहिलेली पुस्तके

  • एकपात्री प्रयोग : स्वरूप आणि कलारूप (स्नेहवर्धन प्रकाशन)
  • काव्यललित (काव्यसंग्रह)
  • नाट्याक्षरे (स्नेहवर्धन प्रकाशन)
  • बोलता...बोलता... (नाट्यविषयक मुलाखती)
  • मनमोहिनी (आठवणींचा संग्रह)
  • मराठी नाटक आणि डॉक्टर प्रतिमा (स्नेहवर्धन प्रकाशन)
  • स्त्री नाटककारांची नाटके (स्नेहवर्धन प्रकाशन)
  • शब्दललित (ललित लेख)
  • स्त्री समस्या आणि आजचे नाटक (स्नेहवर्धन प्रकाशन)

पुरस्कार

  • रंगत-संगत प्रतिष्ठान आणि साहिल फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांच्या हस्ते डॉ. कोरान्ने यांना "माधव मनोहर पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता. (१ डिसेंबर, २०१०)