"शैला कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठीत अनेक जणांनी प्रवासवर्णने लिहिली. खऱ्या अर्थाने मराठीत प...
(काही फरक नाही)

००:५०, ३१ जुलै २०१३ ची आवृत्ती

मराठीत अनेक जणांनी प्रवासवर्णने लिहिली. खऱ्या अर्थाने मराठीत पहिले प्रवासवर्णन म्हणजे गोडसे भटजींनी लिहिलेले माझा प्रवास’ (१८८७), त्यानंतर रावजी भवानराव पावगी यांचे ’विलायतेचा प्रवास’ हे दोन भागांतले पुस्तक (१८८९, १८९२), माझी विलायतची यात्रा (गोविंद चिमणाजी भाटे-१९३४), आणि धुक्यातून ताऱ्याकडे (अनंत काणेकर-१९४०) ही पुस्तके प्रसिद्ध झाली. अनंत काणेकरांच्या पुस्तकाने प्रवासवर्णन ललित अंगाने कसे लिहिता येते ते मराठीच्या वाचकांना कळाले. पु.ल.देशपांडे यांच्या अपूर्वाई(१९६०) आणि पूर्वरंग(१९६३) या पुस्तकांनी तर लोकप्रियतेची कमाल केली. डॉ. मीना प्रभु यांच्या परदेशी प्रवासवर्णनाच्या पुस्तकांनी ही परंपरा चालूच ठेवली आहे.

असे असले तरी, देशान्तर्गत प्रवास करून प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारी, आणि तीही भरपूर पुस्तके लिहिणाऱ्या शैला कामत या सर्व लेखकांत अनोख्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या विसापेक्षा जास्त असावी. त्यांची काही पुस्तके पुढील यादीत सापडतील :

शैला कामत यांनी लिहिलेली पुस्तके

  • अज्ञात प्रदेश भूतान
  • आसाम मेघालय
  • उत्तराखंड
  • उत्तरायण
  • कांचनगंगेच्या कुशीतील नेपाळ
  • काशी प्रयाग गया त्रिस्थळी यात्रा
  • गढवाल चारी धाम यात्रा
  • गोपुरांचा प्रदेश - तामिळनाडू. ’गोपुरांच्या प्रदेशात’ या नावाचे एक पुस्तक गंगाधर गाडगीळ यांनी लिहिले आहे(१९५२).
  • चला कोकणात
  • दक्षिणेचे आभूषण आंध्रप्रदेश
  • दार्जिलिंग-मिरिक-सिक्कीम
  • पर्यटकांचा स्वर्ग - गोवा
  • पाचूची बेटे - अंदमान निकोबार
  • बंगलोर म्हैसूर उटकमंड
  • बारा ज्योतिर्लिंगे
  • बुद्धाचा अनुयायी निसर्गरम्य भूतान
  • भारताचे व्हेनिस - केरळ
  • भारताचे स्वित्झर्लंड - मेघालय
  • भारतातील कलात्मक देवालये - भाग १ व २
  • भूलोकीचे नंदनवन - काश्मीर
  • महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे
  • महाराष्ट्रातील प्रमुख शहरे
  • महाराष्ट्रातील सागरकिनारे व अभयारण्ये
  • महाराष्ट्रातील हिल स्टेशन्स
  • यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ
  • राजस्थान
  • वादळ ज्योत (कादंबरी) --याच नावाची एक कादंबरी सुमतिदेवी धनवटे यांची आहे.
  • विविधतेने नटलेला मध्यप्रदेश
  • वैशिष्ट्यपूर्ण किल्ले आणि हवेल्यांचे राजस्थान
  • सदाहरित आसाम
  • समृद्ध कर्नाटक
  • समृद्ध संस्कृतीचे सौराष्ट्र
  • संपूर्ण उत्तराचल
  • संपूर्ण ओरिसा
  • सोनार बांगला
  • हिमाचल प्रदेश, वगैरे.