"शरदिनी डहाणूकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
==शिक्षण== |
==शिक्षण== |
||
त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. एस.एस. |
त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. एस.एस.सी.च्या परीक्षेत त्या गुणवत्ता यादीत आल्या होत्या. त्यांना संस्कृत विषयाचे जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक मिळाले होते. इ.स. १९६९मध्ये मुंबईतील जी.एस.मेडिकल कॉलेजमधून उत्तम गुण मिळवीत त्या एम.बी.बी.एस.ची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. अमेरिकेतील रुग्णालयात राहून त्यांनी जननांग वैद्यक आणि प्रसूतिशास्त्रात अंतर्वास उमेदवारी केली, आणि नंतर औषधीशास्त्रात एम.डी. केले. भारतीय आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये खूप रस असल्याने डॉ. शरदिनी डहाणूकरांनी वैद्य [[वेणीमाधव शास्त्री]] यांच्याकडून आयुर्वेदाचे औपचारिक शिक्षण घेतले. त्या आधारावर त्यांनी आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पती आणि त्यांचा औषधोपचारात होणारा उपयोग यांच्याकडे आधुनिक ॲलोपॅथिक नजरेने पहाण्याचा एक नावीन्यपूर्ण मार्ग प्रस्थापित केला. |
||
डॉ. डहाणूकरांना (आयसीएमआर) इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे ’ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर क्लिनिकल फारमॅकॉलॉजी ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन’ चालविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हे केंद्र मुंबईच्या नायर रुग्णालयात स्थापन करण्यात आले. |
डॉ. डहाणूकरांना (आयसीएमआर) इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे ’ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर क्लिनिकल फारमॅकॉलॉजी ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन’ चालविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हे केंद्र मुंबईच्या नायर रुग्णालयात स्थापन करण्यात आले. |
||
ओळ १९: | ओळ १९: | ||
* Heal with Herbs (सहलेखक अविजित हझरा) |
* Heal with Herbs (सहलेखक अविजित हझरा) |
||
* Standard Treatment Guidelines and Essential Drug List |
* Standard Treatment Guidelines and Essential Drug List |
||
* Techniques in Pharmacology and Pharmatech (सहलेखक |
* Techniques in Pharmacology and Pharmatech (सहलेखक निर्मला रेगे आणि ऊर्मिला थत्ते) |
||
* औषधे आणि आपण |
* औषधे आणि आपण |
||
* पांचालीची थाळी |
* पांचालीची थाळी |
||
* फुलवा |
* फुलवा |
||
* |
* मनस्मरणीचे मणी |
||
* सगे सांगाती |
* सगे सांगाती |
||
* स्वास्थ्यवृत्त |
* स्वास्थ्यवृत्त |
१६:५५, २४ जुलै २०१३ ची आवृत्ती
डॉ. शरदिनी अरुण डहाणूकर (जन्म: मुंबई, १९४५; मृत्यू : मुंबई, ४ ऑगस्ट २००२) (माहेरच्या पै दुंगट)या मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होत्या. त्यांचे बंधू डॉ. पी.बी. पै दुंगट बॉम्बे हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग शल्यतज्ज्ञ आहेत.
शिक्षण
त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. एस.एस.सी.च्या परीक्षेत त्या गुणवत्ता यादीत आल्या होत्या. त्यांना संस्कृत विषयाचे जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक मिळाले होते. इ.स. १९६९मध्ये मुंबईतील जी.एस.मेडिकल कॉलेजमधून उत्तम गुण मिळवीत त्या एम.बी.बी.एस.ची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. अमेरिकेतील रुग्णालयात राहून त्यांनी जननांग वैद्यक आणि प्रसूतिशास्त्रात अंतर्वास उमेदवारी केली, आणि नंतर औषधीशास्त्रात एम.डी. केले. भारतीय आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये खूप रस असल्याने डॉ. शरदिनी डहाणूकरांनी वैद्य वेणीमाधव शास्त्री यांच्याकडून आयुर्वेदाचे औपचारिक शिक्षण घेतले. त्या आधारावर त्यांनी आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पती आणि त्यांचा औषधोपचारात होणारा उपयोग यांच्याकडे आधुनिक ॲलोपॅथिक नजरेने पहाण्याचा एक नावीन्यपूर्ण मार्ग प्रस्थापित केला.
डॉ. डहाणूकरांना (आयसीएमआर) इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे ’ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर क्लिनिकल फारमॅकॉलॉजी ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन’ चालविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हे केंद्र मुंबईच्या नायर रुग्णालयात स्थापन करण्यात आले.
मुंबईच्या के.ई..एम. रुग्णालयात डॉ. शरदिनी डहाणूकर यांच्या प्रयत्नाने १९८९ साली आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू झाले, आणि नंतर बीवायएल नायर धर्मार्थ रुग्णालयात २००१मध्ये आयुर्वेद संशोधनासाठी एक ACARTS नावाची संस्था. त्या काळी आयुर्वेदिक वनस्पतींवर व औषधांवर संशोधन करणाऱ्या या भारतातील अद्वितीय आधुनिक वैद्यकीय संस्था होत्या. डॉ. शरदिनी डहाणूकरांच्या संशोधनाने भारतात अस्तित्वात असलेल्या परंपरागत वैद्यकीय ज्ञानाचा आधुनिक कसोट्यांवर पडताळा घेता आला. या कामासाठी डहाणूकरांना अनेक पुरस्कार मिळाले.
मृत्यूपूर्वीपर्यंत डॉ. शरदिनी डहाणूकर प्राध्यापक, क्लिनिकल फारमॅकॉलॉजीच्या खातेप्रमुख आणि मुंबईतील टोपीवाला मेडिकल कॉलेजच्या आणि बीवायएल नायर हॉस्पिटलच्या डीन होत्या.
शरदिनी डहाणूकरांनी आणि डॉ.ऊर्मिला थत्ते यांनी मिळून आयुर्वेदावरील अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्याशिवाय डहाणूकरांची वृक्ष, फुले आणि अन्य वनस्पतींवरची माहितीपूर्ण ललित पुस्तके एकमेवाद्वितीय आहेत.
ग्रंथलेखन
- A Drag is Born (सहलेखिका डॉ.ऊर्मिला थत्ते)
- Ayurveda Darshan (सहलेखिका डॉ.ऊर्मिला थत्ते)
- Ayurveda Revisited (सहलेखिका डॉ.ऊर्मिला थत्ते)
- Ayurveda Unravelled (सहलेखिका डॉ.ऊर्मिला थत्ते)
- Heal with Herbs (सहलेखक अविजित हझरा)
- Standard Treatment Guidelines and Essential Drug List
- Techniques in Pharmacology and Pharmatech (सहलेखक निर्मला रेगे आणि ऊर्मिला थत्ते)
- औषधे आणि आपण
- पांचालीची थाळी
- फुलवा
- मनस्मरणीचे मणी
- सगे सांगाती
- स्वास्थ्यवृत्त
- वृक्षगान
- हिरवाई
पुरस्कार
- बनारसच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंडियन मेडिसिनकडून मान्यता आणि सन्मान
- डॉक्टरी व्यवसायात राहून आयुर्वेदावर अत्युत्कृष्ट संशोधन करण्याबद्दल डॉ. वसंत पै पुरस्कार
- आयुर्वेदावरील संशोधनात भर टाकल्याबद्दल ’महिला गौरव पुरस्कार’ आणि ’वनिता समाज गौरव पुरस्कार’.