"माधवी देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: माधवी देसाई या मराठीतील एक लेखिका होत्या. भालजी पेंढारकर आणि ल... |
(काही फरक नाही)
|
२३:५३, १७ जुलै २०१३ ची आवृत्ती
माधवी देसाई या मराठीतील एक लेखिका होत्या. भालजी पेंढारकर आणि लीला पेंढारकर यांच्या कन्या व रणजित देसाई या लेखकाच्या त्या पत्नी होत्या. रणजित देसाई यांची आधीची पत्नी जिवंत असतानाच त्यांनी माधवीशी विवाह केला होता. माधवी देसाई यांचे नवऱ्याच्या नातेसंबंधांवर आधारित ’नाच गं घुमा’ हे आत्मचरित्र अतिशय गाजले. त्यांच्या यांच्या ३५ कादंबऱ्या, एक आत्मचरित्र, काही कथासंग्रह आणि काही व्यक्तिचित्रसंग्रह अशी बरीच साहित्य रचना आहे.
बेळगावजवळ कडोली येथे सत्तावीस वर्षांपूर्वी त्यांनी प्रा. तुकाराम पाटील यांच्या सहकार्याने साहित्य संमेलन सुरू केले. त्यानंतरच सीमाभागात साहित्य संमेलने आणि मराठी भाषेची चळवळ वाढली. मरणापूर्वीची वीसेक वर्षे त्यांचे वास्तव्य गोव्यात होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑक्टोबर २०१२मध्ये, माधवी देसाई आपल्या कन्या कवयित्री मीरा तारळेकर यांच्याकडे बेळगावात रहावयास आल्या.
वयाच्या ८०व्या वर्षी, म्हणजे १५ जुलै २०१३ रोजी सकाळी साडे चारला त्यांचे बेळगाव येथे निधन झाले.
कुटुंब
- पती कै. रणजित देसाई
- कन्या लेखिका यशोधरा काटकर (मुंबई), कवयित्री मीरा तारळेकर (बेळगाव) आणि गीतांजली भुरके
- जावई आणि नातवंडे
माधवी देसाई यांनी लिहिलेली पुस्तके
- अंजलीबाई मालपेकर यांचे चरित्र
- असं म्हणू नकोस (कथासंग्रह)
- कथा एका राजाची (कादंबरी)
- कथा सावलीची (स्त्रीविषयक कथा)
- कांचनगंगा (कथा)
- किनारा (कथा)
- गोमन्त सौदामिनी (गोव्यातील १०० कर्तबगार महिलांवर त्यांनी लिहलेले पुस्तक)
- जगावेगळी (कादंबरी)
- धुमारे (कथा, प्रवासवर्णन)
- नकोशी (कथासंग्रह)
- नर्मदेच्या तीरावर (व्यक्तिचित्र-संग्रह)
- नाच गं घुमा (आत्मचरित्र)
- नियती (कथा)
- परिचय (कथासंग्रह)
- प्रार्थना (कथा)
- फिरत्या चाकावरती (हावठण या कोकणी कादंबरीचा मराठी अनुवाद)
- भारत माझा देश आहे (कादंबरी)
- मंजिरी (कादंबरी)
- विश्वरंग (चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे व्यक्तिचित्रण)
- शाल्मली (ललित लेख)
- शुक्रचांदणी (कथासंग्रह)
- सागर (कथासंग्रह)
- सीमारेषा (माहितीपर कादंबरी)
- सूर्यफुलांचा प्रदेश (व्यक्तिचित्रण)
- स्वयंसिद्ध आम्ही (चरित्रात्मक-संस्कृत)
- हरवलेल्या वाटा (कथा)
पुरस्कार
- सोलापूर येथील भैरू रतन दमाणी पुरस्कार
- सीमावर्ती भागातील साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार