"अल्पायुषी अभिनेते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट-नाट्य सृष्टीत अनेक नट अल्पायुषी ठर...
(काही फरक नाही)

१८:५७, १० जून २०१३ ची आवृत्ती

मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट-नाट्य सृष्टीत अनेक नट अल्पायुषी ठरले. त्यांपैकी काही जण आजारी पडून तर काही अपघाताने मरण पावले. काही थोड्या लोकांनी आत्महत्या केली. अशा दीर्घ आयुष्य जगू न शकलेल्या अभिनेत्यांची ओळख या लेखाद्वारे करण्यात आली आहे.

  • काशीनाथ घाणेकर : मराठी नाट्य अभिनेता. अति मद्यसेवनाने अकाली निधन. वयाच्या ५२व्या वर्षी (२ मार्च१९८६ रोजी).
  • कुंदनलाल सैगल : गायक आणि हिंदी चित्रपट अभिनेता. अति मद्यसेवनाने अकाली निधन. वयाच्या ४२व्या वर्षी, १८ जानेवारी १९४७ रोजी.
  • गीता बाली : हिंदी चित्रपट अभिनेत्री. कांजण्या आल्याने वयाच्या ३५व्या वर्षी (२१ जानेवारी १९६५ रोजी) निधन.
  • गीता रॉय (गीता दत्त) : गायिका आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री. मृत्यू वयाच्या ४१व्या वर्षी, २० जुलै १९७२ रोजी.
  • गुरुदत्त : हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक. वयाच्या ३९व्या वर्षी (१० ऑक्टोबर १९६४ रोजी) आत्महत्या.
  • दिव्या भारती: हिंदी चित्रपट अभिनेत्री. हिने वयाच्या १९व्या वर्षी (५ एप्रिल १९९३ रोजी) आत्महत्या केली (किंवा तिचा खून झाला).
  • दीनानाथ मंगेशकर : मराठी नाट्यसृष्टीतील गायक-नट, नाट्य दिग्दर्शक, निर्माते. अति मद्यसेवनाने आणि दारिद्ऱ्याने अकाली निधन. वयाच्या ४१व्या वर्षी (२४ एप्रिल १९४२ रोजी).
  • मास्टर परशुराम :
  • प्रिया राजवंश :
  • भक्ती बर्वे इनामदार : हिंदी-मराठी चित्रपटांत आणि मराठी-गुजराथी नाटकांत काम करणारी अभिनेत्री. मोटार अपघातात ५२व्या वर्षी मरण.(१२ फेब्रुवारी २००१ रोजी)
  • मधुबाला : हिंदी चित्रपट अभिनेत्री. रक्ताच्या कर्करोगाने अकाली निधन. वयाच्या ३६व्या वर्षी (२३ फेब्रुवारी १९६९ रोजी).
  • मनमोहन देसाई : हिंदी चित्रपट दिग्दर्शक. १ मार्च १९९४ रोजी आत्महत्या.
  • मीना कुमारी : हिंदी चित्रपट अभिनेत्री. अति मद्यसेवनाने अकाली निधन. वयाच्या ३९व्या वर्षी (३१ मार्च १९७२ रोजी).
  • मेरिलिन मनरो: हॉलिवुडची अभिनेत्री. औषधाचा मोठा डोस घेतल्याने अकाली मृत्यू (अपघात किंवा आत्महत्या, वयाच्या ३६व्या वर्षी-५ ऑगस्ट १९६२ रोजी).
  • लक्ष्मीकांत बेर्डे :
  • संजीव कुमार : हिंदी चित्रपट अभिनेता. वयाच्या ४७व्या वर्षी (६ नोव्हेंबर १९८५ रोजी) निधन.
  • सिल्क स्मिता : दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री. वयाच्या ३६व्या वर्षी (२३ सप्टेंबर १९९६ रोजी) आत्महत्या.
  • स्मिता पाटील : मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री. वयाच्या ३१व्या वर्षी (१३ डिसेंबर १९८६ रोजी) बाळंतपणात निधन.
चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध असलेल्या पण अल्पायुषी ठरलेल्या काही अन्य व्यक्ती
  • गुलशनकुमार : चित्रपट व अन्य प्रकारच्या संगीताच्या कॅसेट्‌स निर्माण करणारे व्यावसायिक. खून झाल्याने वयाच्या ४८व्या वर्षी (१२ ऑगस्ट १९९७) मृत्यू.
  • वर्षा भोसले : गायिका. आत्महत्या.
  • सुरेश अलूरकर : हिंदी-मराठी चित्रपट व अन्य प्रकारच्या संगीताच्या कॅसेट्‌स निर्माण करणारे व्यावसायिक. खून झाल्याने वयाच्या ५९व्या वर्षी (१४ डिसेंबर २००८)मृत्यू.