"विठ्ठल भिकाजी वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३७: | ओळ ३७: | ||
* २ रे यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन - देहू |
* २ रे यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन - देहू |
||
* ४५ वे विदर्भ साहित्य संमेलन - कारंजा लाड |
* ४५ वे विदर्भ साहित्य संमेलन - कारंजा लाड |
||
* २ मार्च२०१०ला ’चांदूर रेल्वे’ येथे भरलेले ४थे शब्दगंध मराठी साहित्य संमेलन |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
१३:०३, २० मे २०१३ ची आवृत्ती
प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकजी वाघ (जन्म : हिंगणी-अकोलाजिल्हा, १ जानेवारी १९४५) हे मराठीतील एक कवी आणि लेखक आहेत. ते मराठी हा विषय घेऊन एम.ए. पीएच.डी.झाले आहेत. विठ्ठल वाघ हे अकोल्यातील ’शिवजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’तून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
विठ्ठल वाघ यांनी अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे अमेरिका, कॅनडातून यां देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम झाले आहेत. विठ्ठल वाघ हे महाराष्ट्रातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक, ’बालभारती’ इयत्ता १ ते ७ चे संपादन प्रमुख होते. त्यांनीलिहिलेल्या पाठांचा आणि कवितांचा समावेश, अनेक विद्यापीठांतील व उच्च माध्यमिक विद्यालयांतील पाठ्यक्रमांत झाला आहे.
डॉ. विठ्ठल वाघ यांच्या साहित्यकृती
- काव्यसंग्रह
- कपाशीची चंद्रफुले
- काया मातीत मातीत
- गावशीव
- पंढरीच्या वाटेवर
- पाऊसपाणी (या पुस्तकाला केशवसुत पुरस्कार मिळाला होता.)
- साय
- वृषभसूक्त
- कादंबरी : डेबू (गाडगे बाबांच्या जीवनावर)
- संशोधनात्मक लिखाण
- पारंपरिक वऱ्हाडी म्हणींचा सर्वागीण अभ्यास(पीएच.डी.चा प्रबंध)
- पारंपरिक वऱ्हाडी म्हणी(संग्रह)
- वऱ्हाडः इतिहास व बोली
- वऱ्हाडी म्हणी आणि लोकधर्म (पुरस्कारप्राप्त पुस्तक)
- वऱ्हाडी म्हणींतील वाङ्मयीन सौंदर्य
- रूपांतरे : म्हणी कांचन(ज्ञानेश्वरीतील ३ हजार ओव्यांचे म्हणीत रूपांतर)
- पटकथा/गीत लेखन :
- अरे संसार संसार- या चित्रपटातील गीत लेखनासाठी पुरस्कार मिळाला.
- देवकीनंदन गोपाला-गीत, पटकथा, संवादलेखन. याबद्दल पुरस्कार मिळाला.
- राघू मैना - पटकथा संवाद लेखन( भूमिका : नाना पाटेकर/मधू कांबीकर)
- शंभू महादेवाचा नवस- गीत लेखन
- दूरचित्रवाणी मालिकाः
- काज - पटकथा, संवाद लेखन
- गोट्या - पटकथा, संवाद लेखन
संमेलनाध्यक्ष म्हणून सन्मान
- औंध साहित्य संमेलन - पुणे
- ९ वे कामगार साहित्य संमेलन - अकोला
- पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे भरलेले विभागीय साहित्य संमेलन
- बोली साहित्य संमेलन - अंबाजोगाई
- मायबोली साहित्य संमेलन - मुखेड
- २ रे यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन - देहू
- ४५ वे विदर्भ साहित्य संमेलन - कारंजा लाड
- २ मार्च२०१०ला ’चांदूर रेल्वे’ येथे भरलेले ४थे शब्दगंध मराठी साहित्य संमेलन
पुरस्कार
- अरे संसार संसार’ या चित्रपटातील्गीतलेखनासाठी ????पुरस्कार
- कवी डॉ. विठ्ठल वाघ आणि पत्नी प्रभा वाघ यांना यशवंतराव प्रतिष्ठानचे यशवंत-वेणू पुरस्कार मिळाले आहेत.
- ’पाऊसपाणी’ या पुस्तकाला केशवसुत पुरस्कार मिळाला होता.
- ’वऱ्हाडी म्हणी आणि लोकधर्म’ या पुस्तकाला ????पुरस्कार