"विठ्ठल भिकाजी वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्राचार्य डॉ. '''विठ्ठल भिकजी वाघ''' (जन्म : हिंगणी-अकोलाजिल्हा, १ जान...
(काही फरक नाही)

२३:०१, १९ मे २०१३ ची आवृत्ती

प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकजी वाघ (जन्म : हिंगणी-अकोलाजिल्हा, १ जानेवारी १९४५) हे मराठीतील एक कवी आणि लेखक आहेत. ते मराठी हा विषय घेऊन एम.ए. पी‍एच.डी.झाले आहेत. विठ्ठल वाघ हे अकोल्यातील ’शिवजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’तून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.

विठ्ठल वाघ यांनी अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे अमेरिका, कॅनडातून यां देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम झाले आहेत. विठ्ठल वाघ हे महाराष्ट्रातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक, ’बालभारती’ इयत्ता १ ते ७ चे संपादन प्रमुख होते. त्यांनीलिहिलेल्या पाठांचा आणि कवितांचा समावेश, अनेक विद्यापीठांतील व उच्च माध्यमिक विद्यालयांतील पाठ्यक्रमांत झाला आहे.

डॉ. विठ्ठल वाघ यांच्या साहित्यकृती

  • काव्यसंग्रह
    • कपाशीची चंद्रफुले
    • काया मातीत मातीत
    • गावशीव
    • पंढरीच्या वाटेवर
    • पाऊसपाणी (या पुस्तकाला केशवसुत पुरस्कार मिळाला होता.)
    • साय
    • वृषभसूक्त
  • कादंबरी : डेबू (गाडगे बाबांच्या जीवनावर)
  • संशोधनात्मक लिखाण
    • पारंपरिक वऱ्हाडी म्हणींचा सर्वागीण अभ्यास(पी‍एच.डी.चा प्रबंध)
    • पारंपरिक वऱ्हाडी म्हणी(संग्रह)
    • वऱ्हाडः इतिहास व बोली
    • वरहाडी म्हणी आणि लोकधर्म (पुरस्कारप्राप्त पुस्तक)
    • वऱ्हाडी म्हणींतील वाङ्‌मयीन सौंदर्य
  • रूपांतरे : म्हणी कांचन(ज्ञानेश्वरीतील ३ हजार ओव्यांचे म्हणीत रूपांतर)
  • पटकथा/गीत लेखन :
    • अरे संसार संसार- या चित्रपटातील गीत लेखनासाठी पुरस्कार मिळाला.
    • देवकीनंदन गोपाला-गीत, पटकथा, संवादलेखन. याबद्दल पुरस्कार मिळाला.
    • राघू मैना - पटकथा संवाद लेखन( भूमिका : नाना पाटेकर/मधू कांबीकर)
    • शंभू महादेवाचा नवस- गीत लेखन
  • दूरदर्शन मालिकाः
    • काज - पटकथा, संवाद लेखन
    • गोट्या - पटकथा, संवाद लेखन

संमेलनाध्यक्ष म्हणून सन्मान

  • औंध साहित्य संमेलन - पुणे
  • ९ वे कामगार साहित्य संमेलन - अकोला
  • पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे भरलेले विभागीय साहित्य संमेलन
  • बोली साहित्य संमेलन - अंबाजोगाई
  • मायबोली साहित्य संमेलन - मुखेड
  • २ रे यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन - देहू
  • ४५ वे विदर्भ साहित्य संमेलन - कारंजा लाड