Jump to content

"लक्ष्मण नारायण जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''ल.ना. जोशी''' म्हणजेच लक्ष्मण नारायण जोशी (जन्म : पुणे,५ मार्च १८७३; ...
(काही फरक नाही)

००:०८, १३ मे २०१३ ची आवृत्ती

ल.ना. जोशी म्हणजेच लक्ष्मण नारायण जोशी (जन्म : पुणे,५ मार्च १८७३; मृत्यू : पुणे, १ जुलै १९४७) हे एक मराठीतील ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक, लेखक, ग्रंथसंपादक व पत्रकार होते. त्यांनी शेक्सपियरच्या तीन नाटकांचे मराठीत रूपांतर केले आहे.

मॅट्रिकपर्यंत पुण्यात शिक्षण झाल्यावर ल.ना. जोशी यांनी मुंबईत काही काळ पशुवैद्यकाचे शिक्षण घेतले. मुंबईत असतानाच ते ’इंदुप्रकाश’ व गुराखी’ या पत्रांतून लेखन करू लागले. १८९९ साली पुण्यात रँड व आवर्स्ट यांचे खून झाले, त्याविषयी जोशी यांनी ’गुराखी’त लेख लिहिले. त्याबद्दल त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण वेळ लेखन करायचे असे ठरविले. निरनिराळ्या एकवीस विषयांवर ल.ना. जोशी यांनी सुमारे दीडशे पुस्तके लिहिली. पंडित सातवळेकरांच्या वैदिक वाङ्‌मय प्रकाशनाच्या कार्यात ल.ना. जोशी यांनी मोठे संपादकीय साह्य केले.

ल.ना.जोशी यांची साहित्यसंपदा (कंसात प्रसिद्धी साल)

  • चरित्रे
    • एकनाथ (१९२९)
    • गणपतराव जोशी (१९२३)
    • तुकाराम (१९२९)
    • नामदेव (१९३०)
    • महाराणा प्रतापसिंह (१९२२)
    • बाजीराव (१९३५)
    • ज्ञानेश्वर (१९२९)
  • भाषांतरे
    • अथर्ववेदाचे अन्वयासहित भाषांतर
    • ऋग्वेदाचे कविताबद्ध रूपांतर
    • कपिध्वज (१९०४): शेक्सपियरच्या किंग जॉन या नाटकाचे मराठी रूपांतर
    • डाकिनीविलास (१९१९) : शेक्सपियरच्या मॅकबेथ या नाटकाचे मराठी रूपांतर
  • श्री काशिनाथोपाध्याय विरचित धर्मसिंधू (मराठी भाषांतरासहित)
    • सार्थ छंदोबद्ध पुरुषसूक्त (१९३४)
    • जीवनाथ विरचित भाव कुतूहल (१९२१). यात ऋग्वेदादी संहिता, धर्मसिंधू, अध्यात्मरामायण आणि विविध स्तोत्रे यांची सटीप भाषांतरे आहेत.


(अपूर्ण)