"हिंदू देवांचे प्रकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: हिंदू धर्म हा अपौरुषेय आहे. म्हणजे त्याची स्थापना कोणत्याही माण... |
(काही फरक नाही)
|
१३:३४, १० मे २०१३ ची आवृत्ती
हिंदू धर्म हा अपौरुषेय आहे. म्हणजे त्याची स्थापना कोणत्याही माणसाने केलेली नाही. त्यामुळे तो साधनदोष (errors of instrument) आणि अभिज्ञान (cognition)यांपासून मुक्त आहे. त्यामुळे वेदग्रंथ व उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता नसती तरी हिंदूधर्म राहिलाच असता. हिंदू देव हे शाश्वत, अविनाशी आणि अमर आहेत. हिंदू देव लढाया करीत असले तरी ते अन्यायाची बाजू घेत नाहीत. ते ग्रीक आणि रोमन देवांप्रमाणे एखाद्या माणसाचा द्वेष करीत नाहीत. ते आपापसात भांडत नाहीत, एकमेकांचा मत्सर करीत नाहीत. अनेक हिंदू देव ही निसर्गातील विविध शक्तींची आणि बाबींची रूपे आहेत. या हिंदू देवांमध्ये अनेक जाती आहेत. त्यांची जातिनुसार उतरंडही आहे.
देवांमधल्या प्रमुख जाती
- वैदिक देव आणि देवता : इंद्र, उषा, वायु, वरुण,
- पौराणिक देव
- ऐतिहासिक देव
- लोकसंस्कृतीतील देव : खंडोबा
- ग्रामीण देव :
- अवतार : राम, श्रीकृष्ण, नृसिंह (नरसिंह), बुद्ध, परशुराम
- देवता
- देवी
- देवपत्नी
- दुय्यम देव : नारद, तुंबरू, ऋद्धी, सिद्धी
- अर्धदेव (यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा आणि विद्याधर वगैरे)
- देवस्वरूप प्राणी : ऐरावत, कासव, खंडोबाचा घोडा, गणपतीचा उंदीर, गरुड, दत्ताची गाय आणि दत्ताचे कुत्रे, नंदी,
अशा अनेक देवांमधील खंडोबा या एका दुय्यम समजल्या जाणाऱ्या देवाचे स्थान फार मोठे आहे. या देवाची महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्रप्रदेशात अनेक तीर्थस्थाने आणि देवळे आहेत. त्यांतील कांही ही अशी :
- अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद जिल्हा)
- आदी मैलार (बीदर जिल्हा) (गुलबर्ग्याजवळ)
- काळज (ता. फलटण)(सातारा जिल्हा)
- जेजुरी (पुणे जिल्हा) (खंडोबा देवाचे मुख्य पीठ)
- देवरगुड्डा (राणीबेन्नूर)
- निमगाव दावडी (पुणे जिल्हा)
- पाली (सातारा जिल्हा)
- पिंपळगाव निपाणी ता. निफाड जि. नाशिक
- मंगसुळी (बेळगाव जिल्हा)
- माळेगाव (नांदेड जिल्हा)
- मैलार लिंगप्पा (खानापूर, बेळगाव जिल्हा)
- मैलारपूर (यादगीर) (बेळ्ळारी जिल्हा)
- शेगुड (अहमदनगर जिल्हा)
- सातारे (औरंगाबाद जिल्हा)
- खंडोबाची पत्नी यमाई हिची स्थाने
- यमाई, औंध (सातारा जिल्हा)
- यमाई, राशीन अहमदनफ़्गर जिल्हा)
- येमाई, कवठे, शिरूर तालुका (पुणे जिल्हा)