Jump to content

"शंकर आबाजी भिसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शंकर आबाजी भिसे (जन्म मुंबई, २९ एप्रिल १९६७;मृत्यू : ७ एप्रिल १९३५) ...
(काही फरक नाही)

०१:२४, ७ मे २०१३ ची आवृत्ती

शंकर आबाजी भिसे (जन्म मुंबई, २९ एप्रिल १९६७;मृत्यू : ७ एप्रिल १९३५) हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते.

शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होई. त्यामुळे उत्तेजनार्थ त्यांनी शंकररावांना महिना ३० रुपये पगारावर अकाउन्टन्ट जनरलच्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटवले.

त्याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७मध्ये ' इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड' नामक मासिकाने 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करुन देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकीर्दीची ही सुरुवात होती.

पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आणि त्यांतील ४० हून अधिक आविष्कारांची पेटंटे घतली.

१९०० साली मद्रास येथे भरलेल्या 'इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस'चे ते अध्यक्ष होते. भारतात विज्ञानाच्या प्रगतीसाठी टाटा-भिसे सिंडिकेटची स्थापना करण्यात आली. १९२० साली त्यांनी 'अमेरिकन भिसे आयडियल टाइप कास्टर कॉर्पोरेशन' ची स्थापना केली. सूर्यकिरणावर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती. त्यांच्या टाइप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एससी. ही पदवी दिली.

जागतिक दर्जाच्या 'हू’ज हू' या संदर्भग्रथात भारताचे एडिसन असे म्हणून शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आले आहे. त्यावेळी एडिसननेही आपल्या या भारतीय एडिसनची २३ डिसेंबर १९३० ला न्यू जर्सी येथे भेट घेतली होती.

भिसे यांनी आविष्कार केलेली यंत्रे

  • स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र. स्पर्धेसाठी बनविलेले यंत्र. यासाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले.
  • स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र - त्यांच्या या यंत्रामुळे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आपोआप कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला.
  • भिसे मुद्रण यंत्र - हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. हे यंत्र मिनिटाला २४०० टाइप पाडत असे.
  • समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा.
  • वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र.
  • एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या सहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र.
  • धुण्यासाठी ' रोला ' नावाचा रासायनिक पदार्थ.
  • जखमांवर लावण्यासाठी पाण्यात विरघळणारे ॲटॉमिक आयोडीन - या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली.

निधन

या मराठी शास्त्रज्ञाचे ७ एप्रिल १९३५ रोजी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले.