Jump to content

"भारतातील याकारान्त आडनावांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतीय आडनावांमध्ये अनेकदा काही सूत्र असते. ग्रामनामावरून पडले...
(काही फरक नाही)

००:२४, १७ मार्च २०१३ ची आवृत्ती

भारतीय आडनावांमध्ये अनेकदा काही सूत्र असते. ग्रामनामावरून पडलेल्या मराठी आडनावांच्या शेवटी ’कर’ हा प्रत्यय असतो. मुळगावकर, माडखोलकर, पुणेकर, माहीमकर ही त्याची उदाहरणे. जर त्या मराठी माणसाचे मूळ तेलंगणातले असेल तर ’कर’ऐवजी ’वार’ हा प्रत्यय असतो. उदा० अन्नमवार, कन्नमवार, चिद्रेवार, तालेवार, तुमपल्लीवार, नंदनवार. पारपिल्लेवार, बोजेवार, मुनगंटीवार वगैरे. उत्तरी भारतात ’वार’ऐवजी ’वाल’असते. आगरवाल, बकलीवाल, धारीवाल इ.इ. धंद्यावरून किंवा गावांवरून ठेवली जाणारी बोहरी आणि पारशी आडनावे - कोलंबोवाला, दारूवाला, नडियादवाला, ताडीवाला, सोडावॉटरबॉटलओपनरवाला वगैरे.

याहून एक वेगळा प्रकार म्हणजे याकारान्त नावे. ही हिंदू, मुसलमान, पारशी, जैन आणि ख्रिश्चन या पाचही धर्मीयांमध्ये आढळतात. हिंदूंमधली अशी आडनावे असणारे बहुधा मारवाडी, गुजराती किंवा सिंधी-पंजाबी असतात. नावे अशी -

  • आंटिया
  • कनोजिया
  • कांकरिया
  • कापडिया
  • कुटमुटिया
  • झकेरिया
  • डालमिया
  • देढिया
  • फिरोदिया
  • भांखरिया
  • भाटिया
  • रुईया
  • रेशमिया
  • लोहिया
  • वाडिया
  • सिसोदिया
  • सुरपुरिया, वगैरे वगैरे.


पहा : वार