Jump to content

"राजा नीळकंठ बढे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६९: ओळ ६९:
* क्रांतिमाला (१९५२) - २१ कवितांचा संग्रह
* क्रांतिमाला (१९५२) - २१ कवितांचा संग्रह
* चतुर किती बायका (नाटक)
* चतुर किती बायका (नाटक)
* छंदमेघ (मेघदूताचा काव्यमय अनुवाद)
* पेचप्रसंग, (नाटक)
* पेचप्रसंग, (नाटक)
* रसलीना (बिहारी सतसईचा अनुवाद)
* मखमल (१९७६)
* मखमल (१९७६)
* मंदिका (१९७६)
* मंदिका (१९७६)
* माझिया माहेरा जा (१९५१)(कवितासंग्रह)
* माझिया माहेरा जा (१९५१)(काव्य)
* योजनगंधा (कवितासंग्रह)
* वीणागीते (कवितासंग्रह)
* शृंगार श्रीरंग (गीत गोविंदचा काव्यानुवाद)
* शेफालिका - गाथा सप्तशतीचा काव्यानुवाद
* स्वप्नगंधा (नाटक)
* स्वप्नगंधा (नाटक)
* हसले मनी चांदणे (काव्यसंग्रह) (१९४१)
* हसले मनी चांदणे (काव्यसंग्रह) (१९४१)

१५:१२, ४ मार्च २०१३ ची आवृत्ती

राजा बढे (जन्म : १ फेब्रुवारी १९१२; मृत्यू : ७ एप्रिल १९७७) हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती.

राजा बढे यांचा जन्म नागपुरात, प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५मध्ये त्यांनी पंजाबची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.

सुरुवातीला राजा बढे यांनी दैनिक सकाळच्या संपादकीय विभागात नोकरी केली. नंतर ते वर्षभर नागपूरच्या दैनिक महाराष्ट्रमध्ये सहसंपादक आणि त्याच वेळी वागीश्वरी मासिकाच्या संपादक मंडळात होते; आणि पुढे सावधान साप्ताहिकात लागले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता' म्हणून काम करीत होते. या नोकऱ्यांच्या धरसोडीत त्यांचे कॉलेजशिक्षण राहून गेले. मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी आकाशवाणीला छोटे छोटे माहितीपट करून दिले.

राजा बढे यांनी १९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्षे त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते ’प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले. बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि ’रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला.

राजा बढे यांचा संस्कृत काव्याचा आणि उर्दू शायरीचा चांगला अभ्यास होता. तरीही त्याच्या कवितेतेला भाषा बोजड नव्हती. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या. मुंबईच्या विविधवृत्तात त्या प्रकाशित होत असत.

सावरकरभक्ती

स्वा. सावरकर हे राजा बढे यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला' (१९५२) या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत' ‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही असे गौरवोद्गार काढले आहेत.

’क्रांतिमाला’तील काही कविता

  • ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला',
  • ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले',
  • ‘सुजला सुफला देश आमचा',
  • ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिंधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा'

अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना जनतेने विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे.

  • ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे.


कौंटुबिक जीवन

आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी पालनपोषण यांतच सर्वस्व मानून राजा बढे स्वत: अविवाहित राहिले.

कथाकथन

कथाकथनाचे कार्यक्रम आज सर्वत्र होतात. या कथाकथनाचे खरे बीज रोवले राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर यांनी प्रथमच त्यांच्या कथा कथन केल्या होत्या.

राजा बढे यांचे चित्रपट/नाटके

  • चित्रपट ’अंगुरी’ (अभिनय)
  • ’कलेसाठी सारस्व” या नाटकात भूमिका
  • गळ्याची शपथ, महात्मा विदुर, रामराज्य, रामायण संत बहिणाबाई, वगैरे चित्रपटांचे गीतलेखन
  • चित्रपट ’रायगडचा राजबंदी’ (निर्मिती)

राजा बढे यांच्या गाजलेल्या कविता

  • कधी न पाहिले तुला ()
  • कळीदार कपूरी पान (गायिका सुलोचना चव्हाण)
  • काय कोणी पाहिले ()
  • गर्जा महाराष्ट्र माझा (१९६०) (गायक शाहीर साबळे)
  • चांदणे शिपीत जाशी चालता तू चंचले (गायिका आशा भोसले)
  • ती तूच ना ()
  • ती लोचने कुरंगी ()
  • तुझा शतरंज जोरीचा ()
  • तू कुठे अन्‌ मी कुठे ()
  • ते आठवे आता पुन्ह()
  • दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी ()
  • प्रेम केले काय हा झाला गुन्हा (गायक कुमार गंधर्व)
  • मला मोहू नका ()
  • वाट कशी चुकले रे ()
  • सुजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा (रामायण चित्रपटातले गीत)
  • हसताच नार ती अनार मनी फुले (गायक गजानन वाटवे)
  • हसतेस अशी का मनी (गायिका लता मंगेशकर)
  • ही मिठी तोडून जा ()
  • होशी तू नामानिराळा ()

राजा बढे यांचे पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले साहित्य

  • अशी गंमत आहे (नाटक)
  • ओहोळ (कवितासंग्रह)
  • किती रे दिन झाले (पत्रमय कादंबरी)
  • क्रांतिमाला (१९५२) - २१ कवितांचा संग्रह
  • चतुर किती बायका (नाटक)
  • छंदमेघ (मेघदूताचा काव्यमय अनुवाद)
  • पेचप्रसंग, (नाटक)
  • रसलीना (बिहारी सतसईचा अनुवाद)
  • मखमल (१९७६)
  • मंदिका (१९७६)
  • माझिया माहेरा जा (१९५१)(काव्य)
  • योजनगंधा (कवितासंग्रह)
  • वीणागीते (कवितासंग्रह)
  • शृंगार श्रीरंग (गीत गोविंदचा काव्यानुवाद)
  • शेफालिका - गाथा सप्तशतीचा काव्यानुवाद
  • स्वप्नगंधा (नाटक)
  • हसले मनी चांदणे (काव्यसंग्रह) (१९४१)
  • ही रात सवत बाई (नाटक)