"शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सुखलाल खाबिया, मोहनलाल खाबिया, जुगराज खाबिया यांच्या प्रयत्नांन... |
(काही फरक नाही)
|
१५:२३, १८ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
सुखलाल खाबिया, मोहनलाल खाबिया, जुगराज खाबिया यांच्या प्रयत्नांनी व. रत्नप्रभा खाबिया व श्रीपाल मुठा यांच्या पाठिंब्याने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान ही संस्था दि. २५ डिसेंबर १९९७ रोजी शरद पवार यांचा हस्ते स्थापन झाली. सुरुवातीला केवळ नृत्य, संगीत, नाट्य, चित्रकला, इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडाविषयक उपक्रम करण्याचे प्रतिष्ठानाने ठरवले होते. मात्र नंतर समाजाच्या दृष्टीने गंभीर ठरलेल्या काही सामाजिक प्रश्नांसंबधी जागरुकता निर्माण करण्याच्या संदर्भात संस्थेने काही कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करणे सुरू झाले.
प्रतिष्ठान करीत असलेली कामे
- एड्स विरोधात जनजागृती
- क्षयरोग निर्मूलन
- गुणी आणि गरजू खेळाडूंना प्रोत्साहन
- राम कदम पुरस्काराचे आयोजन
- महाराष्टाचा सांस्कृतिक ठेवा जपणे
- महाराष्टाच्या पारंपरिक संगीतासाठी अद्ययावत संग्रहालय उभारणे
शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे उपक्रम
- एड्सग्रस्तांना आर्थिक मदत
- क्रीडाविषयक आर्थिक मदत
- भव्य जागर - गोंधळ स्पर्धा
- विठू माउली माझी - अभंगवाणी
- संत तुकाराम अभंग व भजन स्पर्धा
शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानातर्फे दिलेल्या कै.राम कदम कलागौरव पुरस्काराचे मानकरी
२००६ -गीतकार जगदीश खेबुडकर २००७ - संगीतकार भास्कर चंदावरकर २००८ - संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स २००९ - गायिका सुलोचना कदम २०१० - गायक चंद्रशेखर गाडगीळ २०११ - संगीतकार अजय-अतुल २०१२ - गायिका उषा मंगेशकर २०१३ - अशोक पत्की