"रेखा बैजल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १४: | ओळ १४: | ||
* आकाशओढ (नाटक) |
* आकाशओढ (नाटक) |
||
* आदिम (एकांकिका) |
* आदिम (एकांकिका) |
||
* आदिम (कथासंग्रह) |
|||
* काँच की दीवार (’भिंत काचेची’ या नाटकाचे हिंदी रूपांतर) |
* काँच की दीवार (’भिंत काचेची’ या नाटकाचे हिंदी रूपांतर) |
||
* काटा रुते कुणाला (चित्रपटकथा) |
* काटा रुते कुणाला (चित्रपटकथा) |
||
ओळ २७: | ओळ २८: | ||
* प्रकाश शलाका (ललित गद्य) |
* प्रकाश शलाका (ललित गद्य) |
||
* प्रकाशाची फुले (कादंबरी) |
* प्रकाशाची फुले (कादंबरी) |
||
* प्रस्थान (कादंबरी) |
* प्रस्थान (कादंबरी) - ’चंद्रकांत’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. |
||
* भिंत काचेची (नाटक) |
* भिंत काचेची (नाटक) |
||
* मम्मी रोबो (एकांकिका) |
* मम्मी रोबो (एकांकिका) |
२३:५३, १५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
रेखा बैजल या मराठवाड्यातल्या जालना या गावी राहणाऱ्या मराठी लेखिका आहेत. त्यांचे माहेरचे नाव रेखा सप्रे. मराठवाड्यातल्या लहान खेड्यांतून नववीपर्यंत शिकत रेखा सप्रे यांनी सोलापूर, जालना, नगर या तीन शहरांतून शिक्षण केले आणि त्या बी.ए. झाल्या. बी.ए.च्या दुसऱ्या वर्गात असल्यापासून त्या मराठीत कथा, निबंध वगैरे लेखन करीत असत.
रेख सप्रे यांचे लग्न शिवकुमार बैजल यांच्याशी झाले. त्या पंजाबी घरात घरकामे करता करता त्यांनी एक्स्टर्नली एम.ए. केले. लहान मुले, त्यांच्या शाळा, अभ्यास घेणे, स्वयंपाक करणे वगैरे गृहिणीची कामे करता करता त्यांचे लिखाण सुरूच राहिले.
अशा प्रयत्नांतून रेखा बैजल यांचा ’मानस’ हा कथासंग्रह निघाला. त्याला ज्योत्स्ना देवधरांची प्रस्तावना होती. त्यांनी नंतर ’आकाशओढ’ हे नाटक लिहिले. या नाटकाचे काही प्रयोग राज्य नाट्यस्पर्धेत झाले. दोन्ही पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले. रेखा बैजल यांची पुढची ‘देवव्रत‘ ही कादंबरी एका निसर्गधर्माविरुद्ध जाऊ पाहणाऱ्या तरुणीची शोकांतिका होती.
रेखा बैजल यांची साहित्य निर्मिती
- अग्निपुष्प (कादंबरी) - या कादंबरीचा हिंदी अनुवाद शिवकुमार बैजल यांनी केला आहे.
- अंतरिक्षातील शेजारी (विज्ञानकथा)
- अब तो जिया जाएँ (हिंदी कविता संग्रह))
- अशब्द (कथासंग्रह)
- अज्ञेय (कादंबरी)
- आकाशओढ (नाटक)
- आदिम (एकांकिका)
- आदिम (कथासंग्रह)
- काँच की दीवार (’भिंत काचेची’ या नाटकाचे हिंदी रूपांतर)
- काटा रुते कुणाला (चित्रपटकथा)
- किडनॅपिंग (विज्ञानकथा)
- क्लोन (विज्ञानकथा)
- जलपर्व (कादंबरी)
- तपस्या (कथासंग्रह)
- तृप्ता (कादंबरी)
- देवव्रत (कादंबरी)
- नक्षत्र (ललित गद्य)
- निसटते किनारे (कथासंग्रह)
- पक्षी जाय दिगंतरा (कथासंग्रह)
- प्रकाश शलाका (ललित गद्य)
- प्रकाशाची फुले (कादंबरी)
- प्रस्थान (कादंबरी) - ’चंद्रकांत’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती.
- भिंत काचेची (नाटक)
- मम्मी रोबो (एकांकिका)
- मानस (कथासंग्रह)
- मृत्यू जगलेला माणूस(कादंबरी)
- युगावर्त (कादंबरी)
- विज्ञानकथा (विज्ञानकथा)
- शिवार (कथासंग्रह)
- स्पंदन (कथासंग्रह)
- स्वप्नस्थ (कथासंग्रह)
मानसन्मान
- आकाशवाणी पुणे, औरंगाबाद, परभणी केंद्रांवरून नभोनाट्य, कथा कवितांचे सातत्याने प्रसारण
- इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलगू भाषांमध्ये साहित्याचे भाषांतर
- गुजरात राज्याच्या मराठी पाठ्यपुस्तकात एका विज्ञानकथेचा समावेश
- परभणीला २-३ एप्रिल २०११ या दिवसांत झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या २ऱ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- दूरदर्शन, ई टीव्ही, तारा, झी मराठी इ. वाहिन्यांवर कथाकथनाचे कार्यक्रम
- मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए., एम.ए. अभ्यासक्रमात कथांचा समावेश
- रेखा बैजल ह्यांच्या समग्र साहित्यावर डॉ. दादा गहिरे यांना डॉक्टरेट (पीएच. डी.)
रेखा बैजल यांना मिळालेले पुरस्कार
- अग्निपुष्प (कादंबरी) - बा.सी. मर्ढेकर पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार
- आदिम (एकांकिका) - वि.र. बाम पुरस्कार
- आदिम (कथासंग्रह) - महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
- जलपर्व (कादंबरी) - महाराष्ट्र सिंचन सहयोग पुरस्कार
- तृप्ता (कादंबरी) - महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
- प्रकाशाची फुले (कादंबरी) - आगाशे पुरस्कार
- भिंत काचेची (नाटक) - महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
- मम्मी रोबो (एकांकिका) - वि.र.बाम पुरस्कार
- युगावर्त (कादंबरी) - महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, कमलाबाई जामकर पुरस्कार, नाथमाधव पुरस्कार
- स्वप्नस्थ (कथासंग्रह) - दि.बा. मोकाशी पुरस्कार
- समग्र लिखाणासाठी
- अनंत काणेकर पुरस्कार
- कुसुमताई चव्हाण पुरस्कार
- पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार
- स्वातंत्र्य सेनानी चारठणकर पुरस्कार
(अपूर्ण)