Jump to content

"रेखा बैजल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''रेखा बैजल''' या मराठवाड्यातल्या जालना या गावी राहणाऱ्या मराठी ले...
(काही फरक नाही)

२१:२८, १५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

रेखा बैजल या मराठवाड्यातल्या जालना या गावी राहणाऱ्या मराठी लेखिका आहेत. त्यांचे माहेरचे नाव रेखा सप्रे. मराठवाड्यातल्या लहान खेड्यांतून नववीपर्यंत शिकत रेखा सप्रे यांनी सोलापूर, जालना, नगर या तीन शहरांतून शिक्षण केले आणि त्या बी.ए. झाल्या. बी.ए.च्या दुसऱ्या वर्गात असल्यापासून त्या मराठीत कथा, निबंध वगैरे लेखन करीत असत.

रेख सप्रे यांचे लग्न शिवकुमार बैजल यांच्याशी झाले. त्या पंजाबी घरात घरकामे करता करता त्यांनी एक्स्टर्नली एम.ए. केले. लहान मुले, त्यांच्या शाळा, अभ्यास घेणे, स्वयंपाक करणे वगैरे गृहिणीची कामे करता करता त्यांचे लिखाण सुरूच राहिले.

अशा प्रयत्नांतून रेखा बैजल यांचा ’मानस’ हा कथासंग्रह निघाला. त्याला ज्योत्स्ना देवधरांची प्रस्तावना होती. त्यांनी नंतर ’आकाशओढ’ हे नाटक लिहिले. या नाटकाचे काही प्रयोग राज्य नाट्यस्पर्धेत झाले. दोन्ही पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाले. रेखा बैजल यांची पुढची ‘देवव्रत‘ ही कादंबरी एका निसर्गधर्माविरुद्ध जाऊ पाहणाऱ्या तरुणीची शोकांतिका होती.

रेखा बैजल यांची साहित्य निर्मिती

  • अग्निपुष्प (कादंबरी)
  • अशब्द (कथासंग्रह)
  • अज्ञेय (कादंबरी)
  • आकाशओढ (नाटक)
  • आदिम (एकांकिका)
  • जलपर्व (कादंबरी)
  • तपस्या (कथासंग्रह)
  • तृप्ता (कादंबरी)
  • देवव्रत (कादंबरी)
  • निसटते किनारे (कथासंग्रह)
  • पक्षी जाय दिगंतरा (कथासंग्रह)
  • प्रकाशाची फुले (कादंबरी)
  • प्रस्थान (कादंबरी)
  • भिंत काचेची
  • मम्मी रोबो (एकांकिका)
  • मानस (कथासंग्रह)
  • मृत्यू जगलेला माणूस(कादंबरी)
  • युगावर्त (कादंबरी)
  • शिवार (कथासंग्रह)
  • स्पंदन (कथासंग्रह)
  • स्वप्नस्थ (कथासंग्रह)



(अपूर्ण)