Jump to content

"राम आपटे प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ राम आपटे प्रतिष्ठान हे जळगावमध्ये १९९१ सालापासून सुरू असलेली...
(काही फरक नाही)

२२:२२, १४ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

डॉ राम आपटे प्रतिष्ठान हे जळगावमध्ये १९९१ सालापासून सुरू असलेली एक सांस्कृतिक संस्था आहे.

पूर्वेतिहास

डॉ. राम आपटे हे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक रसिकमान्य व्यक्तिमत्व होते.. व्यवसायाने ते डॉक्टर असले तरी हाडाने कलावंत होते. कलावंतांविषयी त्यांना आदर होता. कलावंत लहान असो वा मोठा त्याला ते सन्मानाने वागवत. या त्यांच्या गुणामुळेच साहित्य, नाटय, कला क्षेत्रातील अनेकांशी त्यांची जवळीक होती. जळगावचें त्यांचे राहते घर हे या कलावंतांचे माहेरघर होते. जळगावला हे कलावंत आल्यानंतर डॉ राम आपटे यांच्या घरी त्यांनी हजेरी लावली नाही असे होतच नसे.. या कलावंतांच्या आर्थिक स्थितीबद्दल कणव येऊन आपण त्यांच्यासाठी काही केले पाहिजे, या त्यांच्या जाणिवेतून सामाजिक कृतज्ञता निधी उभा रहिला. आणि या निधीकरिता डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, तनुजासारख्या कलावंतांनी मानधन न घेता 'लग्नाची बेडी' या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग केले.

प्रतिष्ठानची स्थापना

१९९० मध्ये डॉ. राम आपटे यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने जळगावच्या, सांस्कृतिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यातूनच १९९१ मध्ये डॉ. राम आपटे यांचे १७ स्नेही एकत्र आले. त्यांत डॉक्टर, प्राध्यापक, वकील, उद्योजक आणि व्यावसायिक होते. त्यांनी एकत्र येऊन डॉ. राम आपटे प्रतिष्ठानची स्थापना केली. डॉ. राम आपटेंचे स्नेही डॉ. बी. व्ही. तथा बाळासाहेब कुळकर्णी हे पहिले आणि डॉ. अशोक दातार हे प्रतिष्ठानचे दुसरे अध्यक्ष झाले. हे प्रतिष्ठान स्थापन करण्याची मूळ कल्पना कै. रामूशेठ अग्रवाल यांची होती आणि तिला कै. प्रा. श्रीरंग राजे यांनी मूर्त रूप दिले होते.

==प्रतिष्ठाने जळगावात करवलेले सुरुवातीचे कार्यक्रम==.

  • १ फेब्रुवारी १९९१ला झालेला पहिला कार्यक्रम : पंडि कुमार गंधर्व यांचे गायन
  • २ फेब्रुवारी १९९१ला झालेला दुसरा कार्यक्रम : डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी, ज्योती सुभाष व शुभांगी संगवई यांच्या प्रमुख भूमिका असलेले आत्मकथा हे नाटक.

हे दोन्ही कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य होते.

नंतरच्या काळातले कार्यक्रम

  • संगीताचे कार्यक्रम
    • पं. जसराज, पं. संजीव अभ्यंकर, प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर, सावनी शेंडे, अजय व अंजली पाहनकर, शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय गायन
    • कलापिनी कोमकली यांची निर्गुणी भजने वगैरे.
    • ब्लॅक ॲन्ड व्हाईट सारखे संगीताचे कार्यक्रम
    • हेमंत पेंडसे यांचे नाट्यसंगीत
  • गद्य कार्यक्रम
    • कवी गुलजार यांचा बात पश्मीने की
    • एक होते गदिमा
    • आयुष्यावर बोलू काही, वगैरे
    • रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्या
  • नाटक, चित्रपट वगैरे
    • दुर्गा झाली गौरी हे बालनाट्य
    • जांभूळ आख्यान हे लोकनाट्य
    • असा मी असामी, आईचं घर उन्हात, आत्मकथा, आम्ही लटिके ना बोलू, एक झुंज वाऱ्याशी, कबड्डी कबड्डी, कस्तुरीमृग, कोण म्हणतं टक्का दिला, खरं सांगायचं तर, गांधी आणि , आंबेडकर, गांधी विरुद्ध गांधी, घाशीराम कोतवाल, चिरंजीव सौभायकांक्षिणी, नकळत सारे घडले, बम्बई के कौए, भले तरी देऊ, मित्र, मी पणशीकर बोलतोय, राहिले दूर घर माझे, वगैरे नाटके.
    • मंगेश पाडगावकर व वसंत बापट यांचे काव्यवाचन, भक्ती बर्वे यांचा ’पुलं, फुलराणी आणि मी’ हा एकपात्री कार्यक्रम, विजय तेंडुलकर यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली प्रगट मुलाखत, दिलीप प्रभावळकर यांचा गाजलेला ’मुखवटे आणि चेहरे’ हा कार्यक्रम वगैरे.
    • बंगलोरच्या रमणमहर्षी अकादमीच्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी सादर केलेला ’तिमिरातून तेजाकडे’ हा आगळावेगळा कार्यक्रम आणि मंगला खाडिलकर यांचा ’आरसा’ हा एकपात्री प्रयोग.
    • ’दहावी फ’ आणि श्वास’ हे चित्रपट वगैरे वगैरे.

प्रतिष्ठानतर्फे देण्यात येत असलेले पुरस्कार आणि ते मिळालेल्या व्यक्ती

  • श्रीरंग राजे पुरस्कार : ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील (२००८), ज्ञानेश्वर गायकवाड(२०१३)
  • कृतज्ञता निधीचा डॉ. राम आपटे पुरस्कार :
  • पुणे येथील लोक उत्सव समितीचे प्रमुख व ‘मासूम’चे कार्यकत्रे मिलिंद चव्हाण यांना ‘डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार
  • डॉ. बी.व्ही. कुळकर्णी पुरस्कार : शास्त्रीय गायक प्रा. नारायण पटवारी यांना

(अपूर्ण)