Jump to content

"मदन हजेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
* आजीचं वासरू
* आजीचं वासरू
* एका बदकाची गोष्ट
* एका बदकाची गोष्ट
* ओठावरची गाणी
* काळी मनी
* काळी मनी
* किशोर क्रांतिकारक भाग १
* किशोर क्रांतिकारक भाग १
* खजिना माहितीचा
* गजरे विकणारी मुलगी
* गजरे विकणारी मुलगी
* गोष्टीच गोष्टी
* चतुर सुगरण
* चतुर सुगरण
* झिम झिम धारा
* ढब्बूची ढोलकी
* तीन किशोर कादंबरिका भाग १
* तीन किशोर कादंबरिका भाग १
* तीन किशोर कादंबरिका भाग २
* तीन किशोर कादंबरिका भाग २
* दहा मोती
* दहा मोती
* दिनविशेष.
* निसर्गराजा
* निसर्गराजा
* पाऊस
* पाऊस
* पावा पुन्हा वाजला
* पावा पुन्हा वाजला
* पुस्तकांची पेटी
* प्रिय पंतप्रधान
* प्रिय पंतप्रधान
* बिरू आणि ढगोबा
* बिरू आणि ढगोबा
* मोर-लांडोर
* रिमझिम धारा
* लहानू
* लहानू
* शिवाई
* शिवाई
* सुंदर भाषणे
* सुंदर भाषणे
* सुंदर सुविचार



००:१२, २१ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

मदन हजेरी (जन्म : १९५४) हे एक मराठीतील बालसाहित्यकार आहेत. ते माध्यमिक शिक्षक, पत्रकार, व्याख्याते, लेखक आणि प्रकाशकही आहेत. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील करंबळी या गावी झाला. एम.ए.बी.एड. झाल्यावर ते नोकरीसाठी कोकणात आले आणि तेथेच स्थायिक झाले. कोकणात राहून त्यांनी सकस बालसाहित्याची निर्मिती केली. मदन हजेरी यांनी प्रथम १९९२ साली कोंबे गावात ज्ञानदीप या नावाचे ग्रंथालय सुरू केले. आणि त्यानंतर त्यांनी २०१२ सालापर्यंत राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात सुमारे ३० ग्रंथालयांची स्थापना केली. त्यांच्या झोकून काम करण्यामुळे कोकणातील बालसाहित्य चळवळीला बळकटी आली. त्यांनी विविध पदे भूषविली आणि मुलांच्या कलागुणांना वाव देणारा, त्यांना संस्कारक्षम करणारा बालविकास नावाचा प्रकल्प त्यांनी राजापूर नगर वाचनालयातून चालवला. त्याचप्रमाणे कोमसापच्या राजापूर शाखेद्वारे त्यांनी त्यांनी ’प्रकट वाचन प्रकल्प’ राबवला.

मदन हजेरी यांची २७ वर्षांच्या काळात बालसाहित्याची ३५हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. किशोर कविता, कथा कादंबरी असे त्यांचे लेखन आहे. ’मूल्यशिक्षण उपयुक्त संकलन’ या नावाचे एक पुस्तक त्यांनी शिक्षकांसाठी लिहिले आहे. ’माझ्या ग अंगणात थवे फुलपाखरांचे’ हे त्यांचे बालगीत प्रसिद्ध आहे.

मदन हजेरी हे इयत्ता नववीच्या मराठी पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळाचे संपादक सदस्य आहेत. ते किशोर मासिकाच्या संपादक सल्लागार समितीचे सदस्य आहेत. ’आपडी थापडी’ या मुलांच्या वार्षिकाचे ते २००० सालापासून संपादक आहेत. राजापूर तालुक्यातल्या ओणी गावी झालेल्या २०१२ सालच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

मदन हजेरी यांनी लिहिलेली पुस्तके

  • आजीचं वासरू
  • एका बदकाची गोष्ट
  • ओठावरची गाणी
  • काळी मनी
  • किशोर क्रांतिकारक भाग १
  • खजिना माहितीचा
  • गजरे विकणारी मुलगी
  • गोष्टीच गोष्टी
  • चतुर सुगरण
  • झिम झिम धारा
  • ढब्बूची ढोलकी
  • तीन किशोर कादंबरिका भाग १
  • तीन किशोर कादंबरिका भाग २
  • दहा मोती
  • दिनविशेष.
  • निसर्गराजा
  • पाऊस
  • पावा पुन्हा वाजला
  • पुस्तकांची पेटी
  • प्रिय पंतप्रधान
  • बिरू आणि ढगोबा
  • मोर-लांडोर
  • रिमझिम धारा
  • लहानू
  • शिवाई
  • सुंदर भाषणे
  • सुंदर सुविचार


  • पाऊस, लहानू आणि शिवाई या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा बालवाङ्‌मय पुरस्कार
  • ग्रंथालय चळवळीसाठीचा महाराष्ट्र सरकारचा डॉ. सी.आर. रंगनाथन ’ग्रंथमित्र’ पुरस्कार
  • रत्‍नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार


बाह्य दुवे